spot_img
7.3 C
New York
Friday, November 21, 2025

Buy now

spot_img
spot_img

राज्यातील पद्म पुरस्कार विजेत्यांचा राजभवन येथे सन्मान

अशोक सराफ, सुलेखनकार अच्युत पालव राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील

समर्पित नेतृत्व लाभल्याशिवाय कोणतेही राज्य प्रगती करु शकत नही. सुदैवाने महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणवसंतराव नाईक यांच्यासारखे द्रष्टे व प्रगल्भ नेते लाभले. प्रगल्भ नेतृत्वामुळे महाराष्ट्राची प्रगती झाली. विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी तसेच देशाला ५ ट्रीलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे आहेअसे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले. 

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या राज्यातील पद्म पुरस्कार व पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचा अभिनंदन सोहळा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. २ ) राजभवन मुंबई येथे झालात्यावेळी ते बोलत होते.

वसंतराव नाईक कृषि संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने या अभिनंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

आपण संसद सदस्य असताना मनोहर जोशी हे लोकसभा अध्यक्ष होते. त्यावेळची लोकसभा तत्कालीन अध्यक्ष मनोहर जोशी यांनी अतिशय कुशलतेने चालवली तसेच सभागृहातील चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात होतील हे सुनिश्चित केले असे राज्यपालांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्व गुणांचा उल्लेख करताना राज्यपालांनी महाराज सच्चे धर्मनिरपेक्ष होते असे सांगितले. आपल्या धर्माचा अभिमान असावा परंतु इतर धर्मांचा तिरस्कार नको असे राज्यपालांनी नमूद केले.

यावेळी दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व दिवंगत पार्श्वगायक पंकज उधास यांना मरणोपरांत पद्मभूषण जाहीर झाल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. उन्मेष जोशी यांनी सन्मान स्वीकारला.

सुलेखनकार अच्युत पालव व अभिनेते अशोक सराफ यांना देखील राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती – अमरावतीची करिना थापा हिला देखील राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.     

पद्मश्री प्राप्त सामाजिक कार्यकर्ते  चैत्राम पवारबासरी वादक रोणू मजुमदार व प्रसिद्ध डॉक्टर विलास डांगरे यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबीयांनी सत्कार स्वीकारला.

कार्यक्रमाला उद्योग व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईकवसंतराव नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले,  प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अविनाश नाईक,  विश्वस्त मुश्ताक अंतुलेआनंद पटवर्धन व अंजली नाईक पिरामल उपस्थित होते.

Related Articles

क्रीडा युवक कल्याण विभागामार्फत ग्लोबल युथ फेस्टिव्हलचे आयोजन

झुंजार सेनापती l मुंबई शहरातील तरूणांसाठी 6 आणि 7 डिसेंबर रोजी जिओ वर्ल्ड गार्डन, वांद्रे येथे क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत श्रीमद राजचंद्र मिशन यांच्या...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियानाला’ गती देणार

झुंजार सेनापती l मुंबई राज्यातील प्रत्येक महिलेच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘आदिशक्ती अभियानाला’ राज्यभर गती मिळत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी राज्यातील...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!