झुंजार सेनापती l बीड
नवगण शिक्षण संस्था संचलित तांदळेश्वर विद्यालय तांदळवाडी घाट या शाळेचा निकाल दरवर्षीप्रमाणे या वर्षीही शंभर टक्के लागला आहे.
नवगण शिक्षण संस्थेचे सहसचिव युवा नेते डॉ योगेश भैय्या क्षीरसागर व डॉ सारिका ताई क्षीरसागर यांनी सर्व विद्यार्थी व पालकांचे विशेष अभिनंदन केले आहे .
त्याचबरोबर नवगण शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष आदरणीय प्राचार्य दीपाताई क्षीरसागर मॅडम यांनीही प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांबरोबर सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व समाधान व्यक्त केले
संस्था प्रशासकीय अधिकारी देशमाने सर व गुट्टे सर यांनीही सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या मुख्याध्यापक डाके सर यांनीही सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .
सन 2024,25 या वर्षी या निकालामध्ये प्रथम क्रमांक विद्यार्थिनी भागडे रोहिणी रामहरी 94.40% गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवला आहे. कळेकर कार्तिक अशोक या विद्यार्थ्यांनी 93.60% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे त्याचबरोबर तृतीय क्रमांक कु वाघमारे नेहा सखाराम या विद्यार्थिनीने 93% घेऊन तृतीय क्रमांक मिळवला आहे कू खोसे अमृता महादेव या विद्यार्थिनीने 92 टक्के मिळवलेले आहेत. टेकडे मयुरी या विद्यार्थिनीने 92 टक्के गुण घेतले आहेत, उखानडे गणेश वाघमारे संदीप या विद्यार्थ्यांस 92टक्के ,जगताप अंकिता प्रभाकर 92टक्के गुण मिळवलेले असून या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .
एकूण बोर्ड परीक्षेसाठी 42 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 40 विद्यार्थी विशेष प्रावीण्य व दोन विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले आहे.
तांदळवाडी , अंधापुरी व पंचक्रोशीतून या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे तांदळवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्याम डाके सर व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर सर्व कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत