spot_img
9.5 C
New York
Saturday, November 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

पुणे विभागातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

झुंजार सेनापती l मुंबई 

पुणे विभागात झालेल्या पावसामुळे नद्यांमध्ये विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेतअसे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.

 राज्य आपत्कालीन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात पाण्याची आवक ६३ हजार ६४५ क्युसेक इतकी होत असुन सद्यस्थितीत धरणात ७२.७९ टक्के इतका पाणी साठा आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर असून अतिवृष्टीमुळे दापोलीखेडचिपळूण आणि संगमेश्वर या तालुक्यांमध्ये झाड कोसळून आणि भिंत पडून खाजगी मालमत्तांचे नुकसान झाले आहे. तसेच पुराच्या पाण्यात जनावरे वाहून गेल्याची नोंद झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग १७३ किमी ३०/६०० चिपळूण तालुक्यातील अंजवेल- रानवेल- पलटणे-श्रृंगरतली- कोटलूक- आबोली- भडगाव चारवेली रास्ता खचला असून  या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू असल्याचे राज्य आपत्कालीन केंद्राने कळविले आहे.

 राज्यात मागील २४ तासांमध्ये (२१ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) रत्नागिरी जिल्ह्यात ३४ मिमी पाऊस झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २७.९ मिमीकोल्हापूर २३.७ मिमीरायगड जिल्ह्यात १२.४ मिमी  आणि पालघर जिल्ह्यात ११.४ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज २१ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे  ७.९रायगड १२.४रत्नागिरी ३४,  सिंधुदुर्ग २७.९पालघर ११.४नाशिक ७.९धुळे ०.१नंदुरबार १.३जळगाव ०.२अहिल्यानगर ०.२पुणे ४.२सोलापूर ०.४,  सातारा १०.६,  सांगली ६.१,  कोल्हापूर २३.७छत्रपती संभाजीनगर ०.९जालना ०.४,  लातूर ०.५धाराशिव ३.२नांदेड ०.१,  परभणी ०.३हिंगोली २.५बुलढाणा ०.३अकोला ०.४वाशिम ०.१ अमरावती ०.१यवतमाळ ०.३वर्धा ०.३नागपूर ०.१भंडारा ०.७गोंदिया ०.५चंद्रपूर १.२ आणि गडचिरोली जिल्ह्यात १.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पालघर जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्तीचा मृत्यूजालना जिल्ह्यात वीज पडून दोन प्राण्यांच्या मृत्यूठाणे जिल्ह्यात पाण्यात बुडून दोन व्यक्तींचा मृत्यूनाशिक जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

Related Articles

क्रीडा युवक कल्याण विभागामार्फत ग्लोबल युथ फेस्टिव्हलचे आयोजन

झुंजार सेनापती l मुंबई शहरातील तरूणांसाठी 6 आणि 7 डिसेंबर रोजी जिओ वर्ल्ड गार्डन, वांद्रे येथे क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत श्रीमद राजचंद्र मिशन यांच्या...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियानाला’ गती देणार

झुंजार सेनापती l मुंबई राज्यातील प्रत्येक महिलेच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘आदिशक्ती अभियानाला’ राज्यभर गती मिळत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी राज्यातील...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!