spot_img
26.2 C
New York
Sunday, July 6, 2025

Buy now

spot_img

आपत्ती व्यवस्थापन विभागाची वारीत जनजागृती मोहीम

‘दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’ 

झुंजार सेनापती l मुंबई

पंढरपूरची आषाढी वारी ही महाराष्ट्राची धार्मिकसांस्कृतिक आणि सामाजिक एकतेची परंपरा आहे. या वारीत ‘दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’. हा राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक अभिनव आणि स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाच्या माध्यमातून वारीमध्ये सहभागी लाखो वारकऱ्यांमध्ये आपत्ती विषयक सजगता निर्माण करण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

चित्ररथ आणि जनजागृतीची प्रभावी माध्यम

वारीमध्ये आकर्षक पद्धतीने सजवलेले चित्ररथपथनाट्य पथकमाहितीपूर्ण स्टॉल्समोबाईल व्हॅन आणि सुलभ भाषेतील माहितीपत्रके वापरून पूरचक्रीवादळदुष्काळगर्दी नियंत्रण यासारख्या आपत्तींविषयी माहिती दिली जात आहे. संकटाला घाबरू नकासज्ज राहा असा सकारात्मक संदेश देत ही दिंडी वारकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. दि. १९ जून पासून वारीबरोबर प्रारंभ झालेल्या या संकल्पनेसाठी ४ चित्ररथ असून ६० लोकांची टीम यामध्ये सहभागी झाली आहे. दि. ६ जुलै, आषाढी एकादशीपर्यंत या चित्ररथाद्वारे व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येणार आहे.

चित्ररथावर विठ्ठल-रखुमाईंची छायाचित्रेवारकरी परंपरेचे दर्शनतसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध उपाययोजनांचे चित्ररूप दर्शन घडते. यामुळे ही संकल्पना अध्यात्मिक श्रद्धेच्या सोबतीने सुरक्षिततेची जाणीव देखील देत आहे.

वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वारीत संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या दोन प्रमुख पालख्यांच्या मागोमाग गावागावातील लहान-मोठ्या दिंड्या सहभागी होत असतात. ही संपूर्ण वारी जिथे भक्तिभावकीर्तनरिंगणअभंग गजरात रंगलेली असतेतिथेच ही दिंडी सजगतेची आपत्ती व्यवस्थापनाची माहिती घेऊन आपले कार्य करत आहे. वारकऱ्यांनी या चित्ररथांचे आणि माहिती स्टॉल्सचे स्वागत केले असूनसजग व सुरक्षित वारी ही संकल्पना सर्वांच्या मनात घर करत आहे.  शासनाचा हा स्तुत्य उपक्रम उपक्रम म्हणजे आपत्ती व्यवस्थापन आणि जनतेच्या सहभागाचा उत्कृष्ट संगम आहे. लाखो वारकऱ्यांचे या निमित्ताने आपत्ती व्यवस्थापन बाबत प्रबोधन होत आहे.

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श :- या उपक्रमातून केवळ आपत्ती व्यवस्थापनाची माहितीच नव्हे तर – संकट काळात कसे वागावेआपला आणि इतरांचा जीव कसा वाचवावाकोणती खबरदारी घ्यावी” यासंबंधी देखील प्रबोधन करण्यात येत आहे, असे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.

Related Articles

फळपिक विमा योजनेचे अर्ज करण्यासाठी चार दिवसांची मुदतवाढ

झुंजार सेनापती l मुंबई हवामान आधारित फळपिक विमा योजनेच्या मर्यादित कालावधीत केंद्र सरकारने मुदतवाढ करून राज्यातील फळपिक शेतकऱ्यांना दिलासा दिल्याची माहिती कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे...

शासकीय जमिनींच्या नियमांमध्ये विशिष्ट कार्यप्रणाली आणणार

झुंजार सेनापती l मुंबई सहकारी गृहनिर्माण संस्था अथवा कृषी, वाणिज्यिक, औद्योगिक व रहिवासी प्रयोजनासाठी कब्जे हक्काने अथवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या आहेत. अशा शासकीय जमिनींचे वर्गीकरण...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!