spot_img
10.4 C
New York
Saturday, November 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे गौरवोद्गार

अंदाज समिती अमृत महोत्सव राष्ट्रीय परिषदेचा समारोप

झुंजार सेनापती l मुंबई

देशाच्या विकासात अंदाज समिती तसेच वित्तीय समित्यांची महत्वपूर्ण भूमिका असून पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुशासनाचा कणा आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास गौरवशाली आणि  प्रेरणादायी राहिला आहे. महाराष्ट्राने देशाला अनेक कल्पक योजना दिल्या आहेत, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी काढले.

संसदेतील व सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील अंदाज समित्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा समारोप  राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत झाला. याप्रसंगी राज्यसभा उपसभापती श्री. हरिवंश, अंदाज समितीचे अध्यक्ष डॉ. संजय जैसवालविधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेविधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरविधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेविधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेमहाराष्ट्र विधानमंडळाचे समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकरविधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेसंसद आणि सर्व राज्ये व संघ राज्य क्षेत्रांच्या प्राक्कलन समित्यांचे अध्यक्ष व सदस्यमहाराष्ट्र विधानमंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले कीमहाराष्ट्र ही भक्तीशक्ती आणि प्रगतीची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी केली. सन १९७० मध्ये महाराष्ट्राने रोजगार हमी योजना सुरू केली  ती देशाने स्वीकारली. सरकारी खर्चाचे नियोजनकार्यक्षमतेचे मूल्यमापन आणि धोरणात्मक सुधारणा यामध्ये अंदाज समित्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. भारताची जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल सुरू असून हा अमृतकाळ महत्वपूर्ण ठरेलअसेही राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

क्रीडा युवक कल्याण विभागामार्फत ग्लोबल युथ फेस्टिव्हलचे आयोजन

झुंजार सेनापती l मुंबई शहरातील तरूणांसाठी 6 आणि 7 डिसेंबर रोजी जिओ वर्ल्ड गार्डन, वांद्रे येथे क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत श्रीमद राजचंद्र मिशन यांच्या...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियानाला’ गती देणार

झुंजार सेनापती l मुंबई राज्यातील प्रत्येक महिलेच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘आदिशक्ती अभियानाला’ राज्यभर गती मिळत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी राज्यातील...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!