spot_img
spot_img

ऊर्जा विभागाच्या कामकाजाचा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घेतला आढावा

झुंजार सेनापती l मुंबई

राज्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सौर ऊर्जा पंपाची मागणी पूर्ण करावी. महावितरण, महाजनको आणि महानिर्मितीने वीज निर्मिती आणि वीज बचतीचे उपक्रम प्रभावीपणे राबवावे असे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले.

एच.एस.बी.सी.बँक, फोर्ट येथे महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्याच्या कामकाजाचा आढावा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर घेतला. महापारेषणचे कार्यकारी संचालक सतीश चव्हाणकार्यकारी प्रकल्प संचालक अविनाश निंबाळकरकार्यकारी संचालक श्रीमती  सुचित्रा भिकानेमुख्य अभियंता पियुष शर्मासंचालक वित्त बाळासाहेब थिटे, संचालक संचालनसंजय मारुडकर, प्रकल्प संचालक अभय हरणेकार्यकारी संचालक नितीन वाघ यासह विभागातील अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी महावितरणमहापारेषण व महानिर्मिती या तिन्ही कंपन्याच्या वीज निर्मितीचे प्रकल्प आणि त्यांची सद्यस्थितीमहाअभिकरण ऊर्जाविभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत आढावा घेतला.

 विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनाशेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनामागेल त्याला कृषी पंप योजनाकेंद्र व राज्य शासनाच्या इतर विविध योजना यांची माहिती यावेळी बैठकीत सादर करण्यात आली.

Related Articles

जीएसटी अधिकारी मृत्यू प्रकरण; मुख्य आरोपी प्रदीप फाटे पुण्यातून अटकेत

झुंजार सेनापती l मुंबई बीड जिल्ह्यातील वस्तू व सेवा कर विभागाचे अधिकारी सचिन नारायण जाधवर यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. या प्रकरणातील...

आखाती देशांतील तणाव; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य सरकार सतर्क

झुंजार सेनापती l मुंबई आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री Devendra Fadnavis...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!