spot_img
spot_img

सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालयाला उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट

आर्ट गॅलरीचे काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

झुंजार सेनापती l मुंबई

सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालयाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन महाविद्यालय परिसरात सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उपसचिव संतोष खोरगडे, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, महाविद्यालयाचे संचालक प्रा. राजीव मिश्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या महाविद्यालयात सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली. काम दर्जेदार करावे आणि वेळेत पूर्ण करावे असे सांगून महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या दुर्मिळ व ऐतिहासिक चित्रसंग्रहाचे जतन आणि सादरीकरण यासाठी त्यांनी Centres of Research & Creativity (CRC) फंडाच्या माध्यमातून एक अत्याधुनिक “आर्ट गॅलरी” उभारण्याच्या प्रस्तावास मंजुरी देऊन या गॅलरीचे  काम दि. ३० डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

या आर्ट गॅलरीमुळे सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टसारख्या ऐतिहासिक संस्थेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक वारशाला अधिक बळकटी मिळणार असल्याचेही मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई मुंबई, दि. २६ : राज्यातील अपुऱ्या पावसामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेल्या ट्रिगर-१ आणि ट्रिगर-२ लागू असलेल्या ३०४ तालुक्यांतील प्रत्येक गावात...

‘तिसऱ्या मुंबई’त १५ लाख रोजगारांचे लक्ष्य!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई रायगड-अलिबाग, दि. २५ : नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र अर्थात नैना परिसराच्या नियोजनबद्ध विकासातून १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!