spot_img
22.3 C
New York
Sunday, July 6, 2025

Buy now

spot_img

महसूल अधिकाऱ्यांची हस्तपुस्तिका’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील

मुंबई : ‘महसूल अधिकाऱ्यांची हस्तपुस्तिकाच्या दोन खंडांचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधान भवन येथे झाले. ही पुस्तिका राज्य प्रशासनासाठी एक अभूतपूर्व व महत्त्वपूर्ण पाऊल असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कर्मयोगी भारत’ या उपक्रमाला बळ देणारी आहेअसे सांगून अधिकर्त्यांबरोबरच नागरिकांना देखील ही मार्गदर्शक ठरेलअसा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेमहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमारमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशीकोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारीअपर जिल्हाधिकारी व इतर महसूल अधिकारी यांना विविध कामे करताना सुलभतेसाठी कायदे व नियम यासंदर्भातील हँडबुक तयार करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला होता. त्यानुसार महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्यासह जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसादजळगावचे अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे तसेच कोकण विभागाचे सहायक आयुक्त रविंद्र पवार यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या हस्तपुस्तिकांच्या कामाचे कौतुक केले.

विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या दोन खंडांमध्ये महसुली कामे (खंड 1) आणि बिगर महसुली कामे (खंड 2) यांचा समावेश असून एकूण 24 प्रकरणे असल्याची माहिती दिली.

Related Articles

फळपिक विमा योजनेचे अर्ज करण्यासाठी चार दिवसांची मुदतवाढ

झुंजार सेनापती l मुंबई हवामान आधारित फळपिक विमा योजनेच्या मर्यादित कालावधीत केंद्र सरकारने मुदतवाढ करून राज्यातील फळपिक शेतकऱ्यांना दिलासा दिल्याची माहिती कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे...

शासकीय जमिनींच्या नियमांमध्ये विशिष्ट कार्यप्रणाली आणणार

झुंजार सेनापती l मुंबई सहकारी गृहनिर्माण संस्था अथवा कृषी, वाणिज्यिक, औद्योगिक व रहिवासी प्रयोजनासाठी कब्जे हक्काने अथवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या आहेत. अशा शासकीय जमिनींचे वर्गीकरण...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!