spot_img
spot_img

राज्यपालांच्या हस्ते ८३ पोलीस अधिकारी,अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील

मुंबई : राष्ट्रपतींनी जाहीर केलेली पोलीस शौर्य पदकउल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राज्यातील ८३ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.

राजभवन येथील दरबार हॉल येथे झालेल्या पदक अलंकरण सोहळ्यामध्ये २०२१ तसेच २०२२ या दोन वर्षांच्या स्वातंत्र्यदिनी जाहीर झालेली पोलीस पदके देण्यात आली.

एक्केचाळीस (४१ ) पोलीस अधिकारी व जवानांना पोलीस शौर्य पदकतीन (३) पोलीस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच एकोणचाळीस (३९) पोलीस अधिकारी व अंमलदारांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली.

पोलीस अलंकरण कार्यक्रमाला गृह राज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयरपोलीस महासंचालक रश्मी शुक्लामहासमादेशक गृहरक्षक दल रितेश कुमारपोलीस महासंचालकमहाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ अर्चना त्यागीमुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांसह पोलीस अधिकारीसेवानिवृत्त पोलीस अधिकारी व गौरविण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते पदकाने अलंकृत पोलीस अधिकारी व अंमलदारांची यादी सोबत जोडली आहे.

Related Articles

विठुरायाच्या दर्शनासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा

⬤ झुंजार सेनापती l मुंबई आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी 'पंढरपूर कॉरिडॉर' प्रकल्पाची...

विठुरायाच्या दर्शनासाठी आधुनिक सुविधा; पंढरपूर कॉरिडॉर उभारणार

⬤ झुंजार सेनापती l पंढरपूर आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने व प्रभावती...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!