spot_img
spot_img

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान

लाखो नागरिकांची होणार मोफत नेत्र तपासणी

झुंजार सेनापती l मुंबई

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर पासून ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ महाराष्ट्रभर राबविले जाणार आहे. महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी २ ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यात येणार आहेत.

या विशेष मोहिमेतून मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना मोफत चष्मेवाटप केले जाणार असून काचबिंदूसह इतर नेत्रविकारांवरील निदान, सल्ला आणि उपचार देखील मोफत केले जाणार आहेत.

जिल्हा व तालुका स्तरावर शिबिरे

राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये, तालुका व गावपातळीवर नेत्र तपासणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. गाव, वस्ती, तांडे, पाडे यांसह दुर्गम भागातील नागरिकांना या शिबिरांचा थेट लाभ होईल. शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालये व संलग्न वैद्यकीय संस्थांकडे पाठवून संपूर्ण मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यात येतील

या अभियानात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, सार्वजनिक आरोग्य विभाग उपक्रमातील संस्थांचा व्यापक सहभाग असणार आहे.

Related Articles

दुष्काळग्रस्त भागात पोषण व आरोग्याच्या काळजीसाठी महिला व बालविकास विभाग सक्रिय

⬤ झुंजार सेनापती l मुंबई निसर्गातील बदल, वाढते तापमान आणि पावसाचा अभाव यामुळे राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा परिणाम केवळ...

विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

⬤ झुंजार सेनापती l मुंबई  महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद, पुणे व नागपूर विभागातील तीन पदवीधर तसेच अमरावती व पुणे विभागातील दोन शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!