spot_img
16.1 C
New York
Thursday, October 9, 2025

Buy now

spot_img

महिला व मुलींच्या आरोग्यसुरक्षेसाठी सेवाभावी संस्थांनी पुढे यावे

पूरग्रस्त भागातील महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅड वितरण

झुंजार सेनापती l मुंबई

मराठवाड्यासह राज्यातील काही भागांमध्ये परतीच्या पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत महिलांच्या आरोग्याच्या गरजांचा विचार करून पूरग्रस्त महिलांसाठी वैयक्तिक स्तरावर पाच लाख सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यात आले आहे. तसेच सक्षम फाउंडेशनतर्फे आणखी दहा हजार सॅनिटरी पॅड पूरबाधित महिलांना देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयात माध्यमांशी बोलताना दिली.

मंत्री तटकरे म्हणाल्यापूरामुळे अनेक कुटुंबांचे जगणे विस्कळीत झाले आहे. शासनामार्फत अन्नवस्त्र व आर्थिक साहाय्य दिले जात असले तरी महिलांच्या आरोग्याशी निगडित सॅनिटरी नॅपकीनसारख्या मूलभूत गरजाही पूर्ण करण्यात येत आहेत. राज्यातील पूरग्रस्तभागातील आठ ते नऊ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजनाच्या राखीव निधीतून सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  

त्याचबरोबर सामाजिक संस्थांना आवाहन करताना मंत्री तटकरे म्हणाल्या कीमहिला व मुलींच्या आरोग्यसुरक्षेसाठी सेवाभावी संस्थांनी पुढे येऊन पूरग्रस्त भागात मदतीचा हात द्यावा. पूरग्रस्त महिलांच्या सन्मान आणि आरोग्याच्या संरक्षणासाठी सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच या महिलांसाठी आधारदायी ठरेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या विकासाचे नवे इंजिन

झुंजार सेनापती l मुंबई नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ विमानतळ नाही, तर महाराष्ट्र आणि भारताच्या आर्थिक विकासाचे नवे इंजिन ठरणार आहे. राज्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात...

पंधरा दिवसांच्या आत ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहांसाठी जागा घ्या

झुंजार सेनापती l मुंबई राज्यात इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली वसतिगृह काही ठिकाणी भाडे तत्त्वावरील जागेत आहेत. वसतिगृहांसाठी आवश्यक शासकीय जागा उपलब्ध करण्याबाबत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!