spot_img
spot_img

राज्यात 15 ऑक्टोबर पासून वादळी पावसाचा अंदाज

शेतकऱ्यांनो काढणी केलेले पिक सुरक्षित ठेवा

झुंजार सेनापती l मुंबई

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे आहे आणि नैऋत्य मान्सूनने राज्यातून निरोप घेतला आहे. मात्र 15 ऑक्टोबर पासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित आहे. या तारखेपासून किमान 18 ऑक्टोबर पर्यंत विदर्भमराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आभाळी हवामान आणि दुपार नंतरचा वादळी पाऊस अपेक्षित आहे.

सध्याच्या अंदाजानुसार वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता आणि प्रमाण हे विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकतंजिथे या दरम्यान अनेक भागांमध्ये आभाळी हवामान अथवा वादळी पावसाची शक्यता राहील. तुलनेत खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो.

शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावेअसे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

Related Articles

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या हरित अर्थव्यवस्थेला चालना

झुंजार सेनापती l मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याच्या दिशेने हरित आणि शाश्वत विकासाला मोठी गती मिळत...

Hoe je slimmer kunt spelen en winnen bij Vegas Hero Casino online

In dit artikel bespreken we praktische strategieën en tips om slimmer te spelen en je kansen op winst te vergroten bij het Vegas Hero...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!