spot_img
14.5 C
New York
Thursday, October 23, 2025

Buy now

spot_img

महाराष्ट्र ‘क्वांटम कॉरिडॉर’ च्या नकाशावर

अमेरिका स्वीडन सोबत महाराष्ट्राचा त्रिपक्षीय करार

झुंजार सेनापती l मुंबई

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम कॉम्प्युटिंग माध्यमातून महाराष्ट्राला तंत्रज्ञानातील जागतिक नकाशावर नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन, अमेरिकेची आयओएनक्यू आणि स्वीडनची स्कैंडियन एबी या दोन नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला. या कराराच्या माध्यमातून महाराष्ट्र आता क्वांटम कॉम्प्युटिंग नकाशावर येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजच्या जगात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम कॉम्प्युटिंग हे जागतिक अर्थव्यवस्थेचे दोन प्रमुख स्तंभ बनले आहेत. महाराष्ट्र शासनाला ‘क्वांटम कॉरिडॉर’ स्थापनेसाठी भागीदारी करताना अभिमान वाटतो. हा उपक्रम राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवेल. शासन या प्रवासात सर्वतोपरी सहकार्य करेल आणि उद्योगांना अखंड वाढीसाठी सुलभ वातावरण उपलब्ध करून देईल.

आयओएनक्यू, मेरीलँड, अमेरिका ही क्वांटम कॉम्प्युटिंग क्षेत्रातील अग्रणी कंपनी असून ट्रॅप्ड-आयन तंत्रज्ञानासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. ही कंपनी ॲमेझॉन ब्रॅकेट, मायक्रोसॉफ्ट अझ्यूर आणि गुगल क्लाउड यासारख्या क्लाउड प्लॅटफॉर्मद्वारे क्वांटम प्रणालींना प्रवेश उपलब्ध करून देते. ओ आयओएनक्यूचे तंत्रज्ञान फार्मास्युटिकल संशोधन, लॉजिस्टिक्स, फायनान्शियल मॉडेलिंग आणि इतर औद्योगिक क्षेत्रांमध्ये वेग, अचूकता आणि शाश्वतता वाढवते. महाराष्ट्रातील डिजिटल परिवर्तन आणि उन्नत तंत्रज्ञानाधारित रोजगार निर्मितीसाठी हे सहकार्य निर्णायक ठरणार आहे.

स्कैंडियन एबी, गोथेनबर्ग, स्वीडन ही कंपनी अभियांत्रिकी, बांधकाम, वित्त आणि औद्योगिक पायाभूत सुविधा विकासात कार्यरत आहे. स्कैंडियन एबी आपल्या प्रकल्पांमध्ये क्वांटम-वर्धित ऑप्टिमायझेशन, प्रेडिक्टिव अॅनालिटिक्स आणि ऊर्जा कार्यक्षमतेसारख्या तंत्रज्ञानांचा समावेश करून शाश्वत आणि स्मार्ट पायाभूत सुविधा विकसित करत आहे.

या सांमजस्य करारप्रसंगी उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक, उद्योग सचिव डॉ. पी. अन्बळगन, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अतिरिक्त विकास आयुक्त वैभव वाघमारे तसेच आयओएनक्यूचे अध्यक्ष जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी निकोलो डी. मासी, स्कैंडियन एबीचे संचालक मंडळ हन्ना फिलिपा गेरहार्डसन आदी उपस्थित होते.

Related Articles

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार तीन हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रासाठी मदत

झुंजार सेनापती l मुंबई यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित...

नाशिक कुंभमेळ्यात भाविकांच्या सेवेसाठी हजारो तरुण राहणार कार्यरत

झुंजार सेनापती l मुंबई आयटीआयमध्ये सुरु होणाऱ्या ‘वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट’ या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार असून पुढच्या वर्षी नाशिक येथे...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!