spot_img
spot_img

साहित्य संघ गिरगाव मुंबई येथे दिवाळी पहाट जल्लोषात साजरी

उत्तरा केळकर, सोनाली कर्णिक, दत्ता मदन, दत्तात्रय मेस्त्री, अभिषेक नलावडे, धनश्री देशपांडे यांची संगीतमय मैफल

झुंजार सेनापती l मुंबई

सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने रसिकांची दिवाळी स्वर संगीताने उजळवण्यात आली. यावेळी गाजलेल्या चित्रपट गीतांचा व भावगीतांचा बहारदार “दिवाळी पहाट” कार्यक्रम साहित्य संघ गिरगाव मुंबई येथे आयोजित करण्यात आला. या प्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी मराठी संस्कृती जपणारे सांस्कृतिक कार्यक्रम करणार असल्याचे प्रतिपादन केले.

या प्रसंगी ख्यातनाम गायिका उत्तरा केळकर यांचा सत्कार करण्यात आला. साहित्य संघ गिरगाव मुंबई येथे रंगलेल्या या कार्यक्रमात गाजलेल्या चित्रपट गीतांचा व भावगीतांचा कार्यक्रम ख्यातनाम गायिका उत्तरा केळकर, सोनाली कर्णिक, दत्ता मदन, दत्तात्रय मेस्त्री, अभिषेक नलावडे, धनश्री देशपांडे, संगीत संयोजन अमित गोठीवरेकर तर निवेदन अमित काकडे यांनी केले.

Related Articles

जीएसटी अधिकारी मृत्यू प्रकरण; मुख्य आरोपी प्रदीप फाटे पुण्यातून अटकेत

झुंजार सेनापती l मुंबई बीड जिल्ह्यातील वस्तू व सेवा कर विभागाचे अधिकारी सचिन नारायण जाधवर यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. या प्रकरणातील...

आखाती देशांतील तणाव; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य सरकार सतर्क

झुंजार सेनापती l मुंबई आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री Devendra Fadnavis...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!