spot_img
spot_img

भारतातील पहिल्या शहरी बोगदा प्रकल्पाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ 

शंभर वर्षे जुन्या ७०० हेरिटेज इमारती आणि रेल्वे लाईन्स च्या खालून जाणारा मार्ग

झुंजार सेनापती l मुंबई

पूर्व मुक्त मार्गामुळे नागरिकांना पूर्व उपनगरातून दक्षिण मुंबईत २०-२५ मिनिटांत पोहोचता येते; मात्र पुढील प्रवासासाठी अर्धा ते पाऊण तास वाहतूक कोंडीत अडकावे लागत होते. तसेच पश्चिम उपनगर आणि दक्षिण मुंबईतील नागरिकांना नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यासाठी लांबचा मार्ग घ्यावा लागत होता. या समस्येवर तोडगा म्हणून ऑरेंज गेट बोगद्याची संकल्पना मडण्यात आली,या प्रकल्पामुळे मुंबईच्या वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी महत्त्वाकांक्षी ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा प्रकल्पाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) चे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमीन पटेल, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आयुक्त रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पूर्वी या ठिकाणी फ्लायओव्हर उभारण्याचा विचार होता; परंतु जागेअभावी आणि प्रचंड वाहतुकीमुळे ते शक्य नाही. हा परिसर मोहम्मद अली रोड फ्लायओव्हरपेक्षाही अधिक दाटीचा असल्याने बोगदा हा एकमेव व्यावहारिक आणि सुरक्षित पर्याय आहे. हा बोगदा जवळपास ७०० प्रॉपर्टीजच्या खालून, शंभर वर्षे जुन्या हेरिटेज इमारती, तसेच पश्चिम आणि मध्य रेल्वे लाईन्सखालून जाणार आहे. विशेष म्हणजे, हा बोगदा मेट्रो-३ च्या ५० मीटर खाली खोदला जाणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प एका अर्थाने ‘इंजिनिअरिंग मार्व्हल’ ठरणार असल्याचे  मुख्यमंत्री  फडणवीस यांनी नमूद केले.

या प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, ते आणखी सहा महिने आधी पूर्ण करण्याचा  प्रयत्न आहे. एल अ‍ॅण्ड टी या नामांकित कंपनीकडे कामाची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.वरळी–शिवडी सी-लिंक पुढील वर्षी खुला झाल्यानंतर, तसेच कोस्टल रोड जोडणी झाल्यावर, पश्चिम उपनगरातील लोकांनाही नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध होतील. त्यामुळे हजारो लोकांचे हजारो तास वाचवणारा हा प्रकल्प असून, मुंबईच्या वाहतुकीसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे, असे मुख्यमंत्री  फडणवीस यांनी यावेळी सांगितले

प्रकल्पाची माहिती

Ø  मुंबई महानगर क्षेत्रातील वाढती वाहतूक मागणी आणि वाहतुकीच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह या मुंबई शहरातील भूमिगत रस्त्याचे बांधकाम हाती घेतले आहे.

Ø  प्रकल्पाचा खर्चः रु ८०५६ कोटी

Ø  पूर्णत्वाचा कालावधीः ५४ महिने

प्रकल्पाचे मुख्य फायदे

 

Ø  मुंबईतील पूर्व-पश्चिम उपनगरे आणि नवी मुंबई या भुयारी मार्गाद्वारे जोडली जाईल.

Ø  प्रवासाचा वेळ १५-२० मिनिटांनी कमी होईल.

Ø  इंधनाची बचत होईल.

Ø  तसेच ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

प्रकल्प तपशील

Ø  हा भारतातील पहिला शहरी बोगदा प्रकल्प असून तो घनदाट लोकवस्ती असलेल्या भागाखालून तसेच मध्य, पश्चिम रेल्वे आणि मुंबई मेट्रो लाईन ३ (अॅक्वा लाईन) च्या ५० मी. खालून जातो.

Ø  प्रकल्पाची एकूण लांबी ९.९६ किमी , ज्यामध्ये जवळपास ७ किमी भुयारी मार्ग .

Ø  प्रत्येक बोगद्यात ३.२ मीटर रुंदीचे २ पदरी रस्ते, १ पदरी आपत्कालीन रस्ता . दोन्ही बोगद्यांमध्ये वेग मर्यादा वेग ८० किमी/तास .

Ø  दोन्ही बोगदे सुरक्षिततेच्या दृष्टीने एकमेकांशी प्रत्येकी ३०० मी. अंतरावर क्रॉसपॅसेजद्वारे जोडले जातील.

Ø  बोगद्यांमध्ये हवा खेळती राहण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या क्षमतेचे यांत्रिकीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. आग प्रतिरोधक यंत्रणा, पुरेशा प्रमाणात प्रकाश व्यवस्था, सुयोग्य व आधुनिक पध्दतीने वाहतूक विनिमयासाठी इन्टीलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टम (आयटीएस) इत्यादी बाबींचे प्रयोजन आहे.

Ø  प्रकल्पाच्या जमिनीखालील संरेखनामुळे भू-संपादन कमी होते, शहरी वातावरण जपते आणि शहरात कमीत कमी व्यत्यय सुनिश्चित करते.

Ø  सदर प्रकल्प हा मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि अटल सेतू सारख्या प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांशी जोडला जातो.

बोगद्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान

या प्रकल्पासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा स्लरी शील्ड प्रकारची टनेल बोरिंग मशीन  असून, ही उच्च तंत्रज्ञानावर आधारित आणि मुंबईच्या किनारी भूगर्भातील मिश्र व खडकाळ भूस्तराकरीता अचूक व सुरक्षित खोदकाम करणारी यंत्रणा आहे.

Ø  हे तंत्रज्ञान मुंबई कोस्टल रोड प्रकल्पात देखील वापरण्यात आले असल्याने कार्यक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे.

टनेल बोरिंग मशीन (टीबीएम)

Ø  प्रकल्पासाठी वापरले जाणाऱ्या टीबीएमचे नूतनीकरण आणि पुनर्निर्मितीची कामे स्थानिक पातळीवर मूळ टनेल बोरिंग मशीन उत्पादक (ओईएम) यांचा देखरेखीत करण्यात आले आहे.

Ø  कटर हेड व्यासः १२.१९ मीटरØ

  लांबी: ८२ मीटर

Ø  वजनः अंदाजे २, ४०० मेट्रिक टन.

Related Articles

How to Effectively Use Your Coinkings Casino Bonus for Maximum Benefit

In the competitive landscape of online gambling, understanding how to maximize your bonuses can significantly enhance your gaming experience. This article will explore effective...

De Geheimen van Een Succesvolle Elite Casino Login Ontsluierd

In deze gids ontdekken we de essentiële elementen voor een succesvolle elite casino login. We zullen de stappen en strategieën bespreken die spelers helpen...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!