झुंजार सेनापती l नवी मुंबई
बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा वरून २५ डिसेंबर २०२५ पासून व्यावसायिक उड्डाणे सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विमानतळ प्रशासनाने आवश्यक तांत्रिक व सुरक्षिततेच्या चाचण्या पूर्ण केल्या असून ऑपरेशनल तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पहिल्या टप्प्यात निवडक देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात येणार असून, यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होणार आहे. आधुनिक प्रवासी सुविधा, डिजिटल चेक-इन, बॅगेज हँडलिंग आणि वाहतूक व्यवस्थेमुळे प्रवाशांना अधिक सुलभ सेवा मिळणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील हवाई वाहतुकीला या विमानतळामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.



