झुंजार सेनापती l प्रतिनिधी l
वाशी येथे कार्यरत असलेले निर्यात सुविधा केंद्र (Export Facilitation Centre – EFC) हे महाराष्ट्रातील कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी महत्त्वाचे केंद्र मानले जाते. राज्य शासनाच्या पणन विभागाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले हे केंद्र शेतकरी, उत्पादक कंपन्या व निर्यातदारांसाठी एकात्मिक सुविधा पुरवते.
या केंद्रात फळे व भाजीपाल्यांचे ग्रेडिंग, पॅकिंग, प्री-कूलिंग, कोल्ड स्टोरेज, गुणवत्ता तपासणी आणि कंटेनरायझेशन अशा अत्यावश्यक सुविधा उपलब्ध आहेत. विशेषतः डाळिंब, द्राक्षे, केळी, आंबा व भाजीपाला या निर्यातक्षम उत्पादनांसाठी हे केंद्र प्रभावी ठरत आहे.
वाशी येथील सुविधा केंद्रातून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, मध्यपूर्व आदी देशांसाठी कंटेनरद्वारे थेट निर्यात केली जाते. यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर, निर्यातदारांना दर्जेदार लॉजिस्टिक सुविधा आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत सुलभ प्रवेश मिळतो.
राज्यातील कृषी-निर्यात वाढवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि ‘फार्म टू फॉरेन मार्केट’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात वाशी येथील निर्यात सुविधा केंद्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.



