झुंजार सेनापती l नवी मुंबई
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या इतिहासात २५ डिसेंबर २०२५ हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला. विमानतळावर पहिलं व्यावसायिक विमान दाखल होताच अग्निशमन दलाच्या पाण्याच्या तोफांनी ‘वॉटर सॅल्यूट’ ने सलामी देत त्या विमानाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. या क्षणामुळे नवी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा आणि ऐतिहासिक टप्पा ठरला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारं हे पहिलंच विमान असल्याने, विमानतळ प्रशासन, सीआयडीसीओ, एअरपोर्ट ऑपरेटर, विमान कंपनीचे अधिकारी तसेच कर्मचारी यांच्यात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. धावपट्टीवर विमान उतरताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांच्या मधून पाण्याचा फवारा मारत विमानाला पारंपरिक ‘वॉटर सॅल्यूट’ देण्यात आला. हा क्षण पाहण्यासाठी उपस्थितांनी मोबाईल कॅमेऱ्यात दृश्य कैद केलं.



