spot_img
spot_img

१५ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी

झुंजार सेनापती  l  मुंबई

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, त्या पार्श्वभूमीवर संबंधित मतदान क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे.
या अधिसूचनेनुसार सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे तसेच विविध सार्वजनिक उपक्रमांना ही सुट्टी लागू राहणार आहे. ही सार्वजनिक सुट्टी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदारसंघाबाहेर कामानिमित्त असलेल्या मतदारांनाही लागू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
महानगरपालिका क्षेत्रांतील केंद्र शासनाची कार्यालये, बँका, सार्वजनिक उपक्रम आणि तत्सम आस्थापनांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहणार असल्याचे शासनाने नमूद केले आहे.
सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या महानगरपालिकांमध्ये बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण–डोंबिवली, पिंपरी–चिंचवड, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, जळगाव, धुळे, जालना, परभणी, नांदेड–वाघाळा, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली–मिरज–कुपवाड, इचलकरंजी, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल, भिवंडी–निजामपूर, उल्हासनगर, मालेगाव, चंद्रपूर आणि अहिल्यानगर यांचा समावेश आहे.
दरम्यान, मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Hoe je slimmer kunt spelen en winnen bij Vegas Hero Casino online

In dit artikel bespreken we praktische strategieën en tips om slimmer te spelen en je kansen op winst te vergroten bij het Vegas Hero...

मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा!

झुंजार सेनापती l मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी प्रभावीपणे खर्च होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर देऊन लाभार्थ्यांची संख्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!