spot_img
spot_img
spot_img

शाई पुसून पुन्हा मतदान करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

झुंजार सेनापती l मुंबई

बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही, याबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे. मतदाराने मतदान केल्यानंतर त्याबाबत नोंद घेण्यात आलेली असते. त्यामुळे केवळ शाई पुसून गैरकृत्य केलेल्या मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही. याबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना पुन्हा एकदा सर्व संबंधिताना देण्यात आल्या आहेत.

मतदाराच्या बोटाला शाई लावण्याकरिता मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने १९ नोव्हेंबर २०११ रोजी आणि २८ नोव्हेंबर २०११ रोजी आदेश निर्गमित केले आहेत. तेव्हापासून स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जात आहे.

Related Articles

महापालिकेच्या महासंग्रामात ११५३ उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला

झुंजार सेनापती  l पुणे  पुणे शहराचा कारभार पुढील पाच वर्षे कोणाच्या हाती जाणार, याचा कौल आज मतदार देणार आहेत. पुणे महानगरपालिकेच्या ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी...

इराण पेटला! २,५००हून अधिक बळी; भारतीयांना तात्काळ देश सोडण्याचे केंद्राचे आदेश

नवी दिल्ली | पीटीआय इराणमध्ये सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनाला सरकारकडून हिंसात्मक मार्गाने दडपण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली आहे. आतापर्यंत या आंदोलनात २,५०० हून अधिक...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!