spot_img
spot_img

“खुमखुमी असेल तर ठाणे-कल्याणमध्ये येऊन लढा!”

श्रीकांत शिंदे यांचे वनमंत्री गणेश नाईक यांना खुले आव्हान

झुंजार सेनापती l अंबरनाथ : वनमंत्री गणेश नाईक यांनी खुमखुमी असेल तर ठाणे किंवा कल्याणमध्ये येऊन माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावे, त्यांना त्यांची जागा कळेल, असे थेट आव्हान खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले. शिवमंदिरात दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी नाईक यांच्यावर जोरदार टीका केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना “माजी” करून टाकू, असे विधान नाईक यांनी केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना शिंदे म्हणाले की, आम्ही लोकांच्या प्रेमावर निवडून आलो आहोत. आजपर्यंत आम्ही कधीही माजी आमदार किंवा माजी खासदार झालेलो नाही.
आमच्यावर टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या घरात डोकावावे. आरोप करणाऱ्यांच्या घरातील तीन सदस्य आधीच ‘माजी’ झाले आहेत, याचा त्यांना विसर पडत चालला आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला.

Related Articles

एक महिन्यात मराठी शिका अन्यथा बॅज निलंबित!

झुंजार सेनापती | मुंबई महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. मराठीचे ज्ञान...

शरद पवारांच्या खासदारांनी घेतली मोदींची भेट रेल्वेपासून बिबट्यापर्यंतच्या प्रश्नांवर चर्चा

⬤ झुंजार सेनापती l नवी दिल्ली  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!