spot_img
spot_img
spot_img

कडक पोलीस बंदोबस्तात कोल्हेंचे व्याख्यान

" विरोधाला चेहरा नसतो"

झुंजार सेनापती  l पुणे 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे अभिनेते व खासदार अमोल कोल्हे यांचे व्याख्यान कडक पोलीस बंदोबस्तात पार पडले. व्याख्यानाच्या आधी काही विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवत कुलगुरूंना निवेदन सादर केल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारल्यामुळे परिचित असलेल्या कोल्हे यांच्या उपस्थितीला काही विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतला होता. शिवजयंती हा सर्व समाजाचा उत्सव असून त्याचे राजकीयकरण होऊ नये, अशी भूमिका विरोधकांनी मांडली होती. मात्र विद्यापीठ प्रशासनाने कार्यक्रम नियोजित वेळेनुसार घेण्याचा निर्णय कायम ठेवला.
सायंकाळी ४ वाजता व्याख्यानास सुरुवात झाली. परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले होते. प्रवेशद्वारांवर तपासणी करूनच विद्यार्थ्यांना आत सोडण्यात येत होते. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
व्याख्यानापूर्वी अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना, “विरोधाला चेहरा नसतो. विचार मांडण्याची भीती वाटली की असा विरोध उभा राहतो,” असे मत व्यक्त केले. “विद्यापीठाने निमंत्रण दिले आहे. विरोध करणाऱ्यांनी व्याख्यान ऐकून प्रश्न विचारावेत,” असेही ते म्हणाले.
वादाच्या पार्श्वभूमीवरही विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभल्याचे चित्र दिसून आले. व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरांचे सत्रही पार पडले.

Related Articles

स्वीकृत नगरसेवक निवडीवरून कोल्हापुरात मोठा राडा

झुंजार सेनापती l प्रतिनिधी  कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून उबाठाचे शहरप्रमुख सुनील मोदी यांची निवड जाहीर होताच पक्षातील अंतर्गत नाराजी उफाळून आली. संतप्त...

मंत्रालयातील लाचप्रकरणात एसीबीची धडपड सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल जप्त

झुंजार सेनापती l मुंबई  मंत्रालय येथे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आल्यानंतर तपासाला वेग आला आहे. या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!