spot_img
spot_img

राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

महाराष्ट्रात १६ मार्चला मतदान

झुंजार सेनापती l मुंबई 
भारत निवडणूक आयोग यांनी देशातील 10 राज्यांमधील रिक्त होणाऱ्या राज्यसभाच्या 37 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश असून, या जागांसाठी 16 मार्च 2026 रोजी मतदान व मतमोजणी होणार आहे.
महाराष्ट्रातील सात जागांसाठी मतदान 16 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत होईल. त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे.
ज्यांची मुदत संपणार
महाराष्ट्रातील पुढील सदस्यांची मुदत 2 एप्रिल 2026 रोजी संपत आहे :
डॉ. भागवत किशनराव कराड
डॉ. फौजिया तहसीन अहमद खान
प्रियंका विक्रम चतुर्वेदी
शरदचंद्र गोविंदराव पवार
धैर्यशील मोहन पाटील
रजनी अशोकराव पाटील
रामदास बंडू आठवले
या सदस्यांच्या मुदती संपत असल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या तारखा
अधिसूचना प्रसिद्धी : गुरुवार, 26 फेब्रुवारी 2026
नामनिर्देशनाचा अंतिम दिनांक : 5 मार्च 2026
छाननी : 6 मार्च 2026
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 9 मार्च 2026
मतदान : 16 मार्च 2026 (सकाळी 9 ते दुपारी 4)
मतमोजणी : 16 मार्च 2026 (सायंकाळी 5 वाजता)
प्रक्रिया पूर्ण : 20 मार्च 2026
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली असून, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना या निवडणुकीमुळे वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Related Articles

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट’चा कोनशिला समारंभ संपन्न

झुंजार सेनापती l  पुणे लता-आशा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालय प्रकल्पात रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. या कार्यात अनेक व्यक्ती...

१ मेपासून मराठी न येणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई; परवाने रद्द होणार

झुंजार सेनापती l मुंबई राज्यातील परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना येत्या १ मे महाराष्ट्र दिनापासून मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात येणार आहे. मोटार परिवहन विभागाच्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!