spot_img
spot_img

रुग्ण दारात तडफडत असताना १०८ रुग्णवाहिका गेटवरच उभी; ‘गाडी नाही’ सांगून सेवा टाळली!

झुंजार सेनापती l  प्रतिनिधी l

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेली १०८ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा अनेक ठिकाणी निष्काळजीपणामुळे प्रश्नचिन्हात आली आहे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ रुग्णवाहिका उभी असतानाही नियंत्रण कक्षातून “गाडी उपलब्ध नाही” असे कारण सांगून रुग्णांना सेवा नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेकनुर येथे एका अपघातात जखमी झालेल्या तीन तरुणांना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात हलवण्याची गरज असताना कुटुंबीयांनी १०८ क्रमांकावर संपर्क साधला. मात्र नियंत्रण कक्षाकडून त्या परिसरात कोणतीही रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, संबंधित रुग्णालयाच्या गेटवरच १०८ रुग्णवाहिका बराच वेळ उभी असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे सेवा उपलब्ध असतानाही ती जाणीवपूर्वक टाळण्यात का आली , असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या घटनेमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. अशा वेळी रुग्णवाहिका उपलब्ध असूनही “गाडी नाही” असे सांगून सेवा टाळणे हे गंभीर निष्काळजीपणाचे उदाहरण असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.
आरोग्य सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या १०८ योजनेचा उद्देश अपघात, हृदयविकार, प्रसूती किंवा अन्य तातडीच्या प्रसंगात रुग्णाला शक्य तितक्या लवकर उपचार मिळवून देणे हा आहे. मात्र अशा प्रकारच्या घटनांमुळे या सेवेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
दरम्यान, या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित कर्मचारी किंवा कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आरोग्य विभागानेही या प्रकरणाची दखल घेत योग्य ती पावले उचलावीत, अन्यथा अशा निष्काळजीपणामुळे एखाद्या रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो. नियंत्रण कक्षाला आमच्या प्रतिनिधीनी जाब विचारला असता या बाबतीत दिलगिरी व्यक्त करुन झालेल्या प्रकाराची चौकशी करू असं कळविण्यात आले आहे.

Related Articles

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला

झुंजार सेनापती l नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पदावरून दूर करण्यासाठी विरोधी पक्षांनी लोकसभेत मांडलेला अविश्वास प्रस्ताव आज आवाजी मतदानाने फेटाळण्यात...

महाराष्ट्राला नवे राज्यपाल; जिष्णु देव वर्मा यांचे मुंबईत आगमन

झुंजार सेनापती l मुंबई  महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी तेलगंणाचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे आज मुंबई येथे सपत्नीक आगमन झाले.  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!