spot_img
spot_img

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला

झुंजार सेनापती l नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पदावरून दूर करण्यासाठी विरोधी पक्षांनी लोकसभेत मांडलेला अविश्वास प्रस्ताव आज आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला. या मतदानात बिर्ला यांच्या समर्थनार्थ २९३ मते पडली, तर त्यांच्या विरोधात २३४ मते पडली.
या प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर, विशेषतः काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. लोकसभेचे कामकाज सुरळीत आणि निष्पक्ष पद्धतीने चालवण्याचे काम अध्यक्षांनी केले असल्याचा दावा सत्ताधारी पक्षांनी केला.
प्रस्तावाच्या विरोधात भारतीय जनता पक्ष (२४०), तेलगू देसम पक्ष (१६), जनता दल (युनायटेड) (१२), शिवसेना शिंदे गट (७), आसाम गण परिषद (१), जनसेना पक्ष (२), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट (१), लोक जनशक्ती पक्ष (५), हिंदुस्तानी अवाम मोर्चा (१) आणि अखिल झारखंड विद्यार्थी संघ (१) यांनी मतदान केले.
तर प्रस्तावाच्या बाजूने काँग्रेस (१९), समाजवादी पक्ष (३७), तृणमूल काँग्रेस (२८), झारखंड मुक्ती मोर्चा (३), राष्ट्रीय जनता दल (४), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (९), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट (८), नॅशनल कॉन्फरन्स (२) तसेच अन्य सात सदस्यांनी मतदान केले.
या मतदानानंतर लोकसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्ताव बहुमताने फेटाळला गेला असून सत्ताधारी आघाडीने आपले संख्याबळ पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

Related Articles

एक महिन्यात मराठी शिका अन्यथा बॅज निलंबित!

झुंजार सेनापती | मुंबई महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. मराठीचे ज्ञान...

शरद पवारांच्या खासदारांनी घेतली मोदींची भेट रेल्वेपासून बिबट्यापर्यंतच्या प्रश्नांवर चर्चा

⬤ झुंजार सेनापती l नवी दिल्ली  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!