spot_img
spot_img

महाराष्ट्राला नवे राज्यपाल; जिष्णु देव वर्मा यांचे मुंबईत आगमन

उद्या राज्यपालपदाची शपथ घेणार

झुंजार सेनापती l मुंबई 

महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी तेलगंणाचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे आज मुंबई येथे सपत्नीक आगमन झाले.
 छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, पोलीस आयुक्त देवेन भरती  आदींनी त्यांचे स्वागत केले.
 लोकभवन येथे आगमन प्रसंगी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना पोलिसांतर्फे मानवंदना देण्यात आली. मंगळवार १० मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता जिष्णु देव वर्मा राज्यपाल पदाची शपथ घेणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय त्यांना शपथ देतील.

Related Articles

एक महिन्यात मराठी शिका अन्यथा बॅज निलंबित!

झुंजार सेनापती | मुंबई महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. मराठीचे ज्ञान...

शरद पवारांच्या खासदारांनी घेतली मोदींची भेट रेल्वेपासून बिबट्यापर्यंतच्या प्रश्नांवर चर्चा

⬤ झुंजार सेनापती l नवी दिल्ली  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!