spot_img
spot_img

गॅस दरवाढीचा भडका; नेकनूरमध्ये रस्ता रोखून‘मोदी हटाव’च्या घोषणां

झुंजार सेनापती l बीड 
केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांचा निषेध करत नेकनूर येथे बसस्थानकासमोर जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. घरगुती गॅस सिलिंडरच्या सतत वाढणाऱ्या किमती, वाढती महागाई आणि बेरोजगारी या ज्वलंत प्रश्नांवरून बहुजन समाजासह विविध पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले.
आंदोलनादरम्यान आंदोलकांनी मुख्य रस्ता रोखून केंद्र सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. “मोदी हटाव, बेटी बचाव” आणि “सरेंडर दे सिलेंडर” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. काही काळ वाहतूक ठप्प झाल्याने परिसरात मोठी गर्दी झाली होती.
हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे सतीश पायाळ, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे तालुका अध्यक्ष गणेश चक्रे आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. आंदोलनानंतर आंदोलकांच्या वतीने प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात ऑल इंडिया पॅंथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ते तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष अजय सरवदे, शिवशक्ती भीमशक्ती संघटनेचे नेते बाळासाहेब मोरे पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा उपाध्यक्ष गोरक्षनाथ कदम, शिवसंग्राम नेते रायचंद कापसे, सरपंच दीपक भालेराव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच मयूर निर्मळ, ओम करे, दिनेश आवळे, अशोक करडे, रवी गायकवाड, बबलू गायकवाड, सिद्धार्थ कानडे, मल्हारी चक्रे, युवा नेते विशाल इंगोले, फुलचंद वारभवन, अकलूज गायकवाड, सुनील जाधव, दिपक चक्रे, मेघराज खिंडकर, सोहम धवन, सोनाजी आवळे, अमोल मुळे, धनराज पायाळ, नितीन पायाळ, स्वप्निल दुनघव, रमेश काळे, अर्जुन धनवे, कृष्णा वारे यांच्यासह बहुजन समाजातील शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

Related Articles

Tutto quello che devi sapere sul bonus Newgioco per i nuovi giocatori

In questo articolo, esploreremo nel dettaglio il bonus newgioco offerto ai nuovi giocatori. Discuteremo delle diverse tipologie di bonus disponibili, dei requisiti di scommessa,...

Kā x3000 lv piedāvājumi var uzlabot jūsu azartspēļu pieredzi

Šajā rakstā mēs aplūkosim, kā x3000 lv piedāvājumi var būtiski uzlabot jūsu azartspēļu pieredzi. Mēs izpētīsim dažādas bonusu iespējas, bezriska griezienus, un citas priekšrocības,...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!