spot_img
spot_img

अमानुषतेचा कळस!अल्पवयीन विवाहितेवरअत्याचार करून गावच्या चावडीत बांधले

झुंजार सेनापती l बीड 
बीड जिल्ह्यात मानवतेला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात अल्पवयीन विवाहित तरुणीवर अत्याचार करून तिला गावाच्या चावडीवरील खांबाला बांधून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा एक चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित होत असून संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही केवळ १७ वर्षांची असून तिचा अल्पवयात विवाह झालेला आहे. दहा मार्च रोजी रात्री ती आपल्या पतीसह घरात झोपलेली असताना आरोपी वैभव पटेकर याने घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत घरात प्रवेश केला. घरातील सर्वजण झोपेत असताना त्याने तरुणीला जबरदस्तीने उचलून गावाबाहेर नेले.
पीडितेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिचे तोंड घट्ट दाबून ठेवले. त्यानंतर गावाबाहेरील नदीपात्राजवळ नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या अमानुष कृत्यानंतर आरोपीने त्या तरुणीला गावातील चावडीसमोर आणून खांबाला दोराने बांधून ठेवले.
सकाळी शुद्धीवर आल्यानंतर पीडित तरुणीने मदतीसाठी आक्रोश केला. मात्र काही काळ तिची दखल घेतली गेली नाही. अखेर तिच्या नातेवाईकांनी तिला त्या ठिकाणाहून सोडवून घरी नेले.
भीतीपोटी दोन दिवस हा प्रकार दडपून ठेवण्यात आला होता. मात्र अखेर पीडित तरुणीने आई आणि मामासह पिंपळनेर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी वैभव पटेकर याला अटक केली.
न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला पुढील चौकशीसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील चित्रफीत समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून आणखी काही जणांचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करून तिला चावडीत बांधून ठेवण्याच्या या अमानुष घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात संताप व्यक्त होत असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Related Articles

A Dazardbet online fiók létrehozása és használata a legjobb játékélmény érdekében

Az online szerencsejáték világa folyamatosan fejlődik, és a felhasználók számára rendkívül fontos, hogy a legjobb játékélmény érdekében megfelelő fiókot hozzanak létre. A Dazardbet, mint...

How to Make the Most of BetMaze Casino’s Welcome Bonuses

Welcome bonuses can greatly enhance your gaming experience at online casinos like betmaze casino. In this article, we will explore effective strategies to maximize...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!