spot_img
spot_img

शेतकरी कर्जमाफीसाठी मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

झुंजार सेनापती l कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पार पडला.
मोर्चात शेतकरी बैलगाड्या आणि शेती साहित्य घेऊन सहभागी झाले होते. निवडणुकीपूर्वी सरकारने संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र, दीड ते दोन वर्षे उलटूनही त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी लागू करावी, अन्यथा पुढील १० ते १५ दिवसांत आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही मनसेकडून देण्यात आला.

Related Articles

Hoe je slimmer kunt spelen en winnen bij Vegas Hero Casino online

In dit artikel bespreken we praktische strategieën en tips om slimmer te spelen en je kansen op winst te vergroten bij het Vegas Hero...

मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा!

झुंजार सेनापती l मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी प्रभावीपणे खर्च होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर देऊन लाभार्थ्यांची संख्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!