spot_img
spot_img

देश संकटात, पण अंधारे बाईंची वाकडे तोंड करून प्रसिद्धी मिळवण्याची धडपड?

⬤ झुंजार सेनापती l मुंबई
देशासमोर निर्माण होणाऱ्या संभाव्य आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय संकटांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन जपून वापरण्याचे तसेच काही काळ सोन्याच्या खरेदीत संयम बाळगण्याचे आवाहन केले. कोणत्याही जबाबदार नेतृत्वाकडून संकटाच्या काळात अशा प्रकारचे आवाहन अपेक्षितच असते. मात्र, या आवाहनावरून उबाठा गटाच्या नेत्या सुष्मा अंधारे यांनी पुन्हा एकदा वाकडे-तिकडे तोंड करून टीका करण्याचा मार्ग निवडला आहे.
राजकारणात विरोध असणे स्वाभाविक असले तरी प्रत्येक विषयावर केवळ टीका करण्यासाठी विद्रूप हावभाव, उपरोधिक भाषा आणि सतत नकारात्मक भूमिका घेणे हे जनतेलाही आता कंटाळवाणे वाटू लागले आहे. राज्यातील अनेक गंभीर प्रश्न प्रलंबित असताना त्यावर ठोस भूमिका मांडण्याऐवजी केवळ माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी अशा प्रकारची नौटंकी केली जात आहे.
सतत प्रत्येक मुद्द्यावर विरोधासाठी विरोध करत राहिल्याने जनतेत विश्वासार्हता कमी होते. स्वतःची स्पष्ट राजकीय दिशा नसताना दुसऱ्यांवर टीका करण्याचा अतिरेक केल्याने “ना घर का, ना घाट का” अशी अवस्था निर्माण होते, 
देशहिताच्या मुद्द्यांवर परिपक्वता आणि संयम अपेक्षित असताना केवळ चेहऱ्यावरील हावभाव आणि उपरोधिक टीकेतून राजकारण करण्याचा प्रयत्न कितपत योग्य आहे.

Related Articles

Hoe je slimmer kunt spelen en winnen bij Vegas Hero Casino online

In dit artikel bespreken we praktische strategieën en tips om slimmer te spelen en je kansen op winst te vergroten bij het Vegas Hero...

मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा!

झुंजार सेनापती l मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी प्रभावीपणे खर्च होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर देऊन लाभार्थ्यांची संख्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!