spot_img
spot_img

भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना ईडीचे समन्स

झुंजार सेनापती l मुंबई 
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणात चाकणकर यांना समन्स बजावत चौकशीसाठी याच आठवड्यात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
दोन दिवसांपूर्वीच विशेष तपास पथकाने रुपाली चाकणकर यांची तब्बल सहा तास चौकशी केली होती. त्यानंतर आता ईडीकडून समन्स बजावण्यात आल्याने या प्रकरणातील तपासाची व्याप्ती आणखी वाढल्याचे मानले जात आहे.
अशोक खरात प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि कथित आर्थिक गैरव्यवहारांच्या अनुषंगाने ईडीकडून तपास सुरू असून संबंधित आर्थिक व्यवहारांची सखोल छाननी केली जात आहे. याआधीही या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या बहिणीची चौकशी करण्यात आली होती. सध्या ईडी विविध संबंधित व्यक्तींची चौकशी करत असून तपासाचा फेरा अधिक व्यापक होत आहे.
दरम्यान, शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातची पत्नी कल्पना खरात यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तहकूब केली आहे. राहाता येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Related Articles

Hoe je slimmer kunt spelen en winnen bij Vegas Hero Casino online

In dit artikel bespreken we praktische strategieën en tips om slimmer te spelen en je kansen op winst te vergroten bij het Vegas Hero...

मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा!

झुंजार सेनापती l मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी प्रभावीपणे खर्च होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर देऊन लाभार्थ्यांची संख्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!