spot_img
spot_img

अवैध दारू दुकाने तात्काळ बंद करण्याची पोलिसांकडे मागणी

अंधापुरीत ग्रामस्थ आक्रमक

झुंजार सेनापती l बीड | प्रतिनिधी :

बीड तालुक्यातील अंधापुरी गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिनांक २७ जुलै २०२६ रोजी पोलिस निरीक्षक, नेकनूर पोलिस ठाणे यांना हे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात अंधापुरी गाव व परिसरात परवानगीशिवाय अवैध दारूची विक्री सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अवैध व्यवसायामुळे गावातील महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून सामाजिक वातावरण बिघडत असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अवैध दारू विक्रीमुळे अनेक कुटुंबांमध्ये वाद निर्माण होत असून कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करून अवैध दारू दुकाने कायमस्वरूपी बंद करावीत तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच, अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने नियमित तपासणी मोहीम राबवावी आणि अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायांवर कायमस्वरूपी नियंत्रण ठेवावे, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
अंधापुरी परिसरातील अवैध दारू विक्रीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या निवेदनानंतर पोलिस प्रशासन कोणती ठोस कारवाई करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या हरित अर्थव्यवस्थेला चालना

झुंजार सेनापती l मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याच्या दिशेने हरित आणि शाश्वत विकासाला मोठी गती मिळत...

Hoe je slimmer kunt spelen en winnen bij Vegas Hero Casino online

In dit artikel bespreken we praktische strategieën en tips om slimmer te spelen en je kansen op winst te vergroten bij het Vegas Hero...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!