spot_img

भर उन्हात मुख्यमंत्र्यांची शेताच्या बांधावर हजेरी; बळीराजाला दिला विश्वासाचा दिलासा!

शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी, भजनातही घेतला सहभाग

⬤ झुंजार सेनापती l नागपूर, दि. ८ : नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी थंडीचा अद्याप पत्ता नाही. दिवसा उन्हाचा कडाका कायम असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर उन्हात थेट शेतात उतरून पिकांची आणि शेतीच्या परिस्थितीची पाहणी केली. मंत्रालयात बसून केवळ आढावा घेण्याऐवजी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत त्यांनी संकटग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. सरकार तुमच्या पाठीशी आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत असल्याने यंदाची दिवाळी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन साजरी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला होता. त्यानुसार ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ते नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे पोहोचले.
गावात दाखल झाल्यानंतर त्यांनी शेतकरी कुटुंबीयांसोबत भोजन केले. त्यानंतर रात्री आयोजित भजनात सहभागी होत ग्रामस्थांसोबत दिवाळीचा आनंद अनुभवला. मुख्यमंत्र्यांनी सणाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या घरी मुक्काम केल्याने गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
थेट शेतात जाऊन जाणल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

८ नोव्हेंबर रोजी सकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्यक्ष शेतात भेट देत शेतीची परिस्थिती जाणून घेतली. सोनेगाव रिठी येथील शेतकरी दिलीप सरोदे यांच्या शेतात जाऊन त्यांनी पाहणी केली. दुष्काळामुळे पिकांसमोर निर्माण झालेली आव्हाने आणि शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
भर उन्हात शेताच्या बांधावर पोहोचलेल्या मुख्यमंत्र्यांच्या या भेटीतून शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न दिसून आला. संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शासन त्यांच्या पाठीशी उभे आहे, हा विश्वास त्यांनी प्रत्यक्ष भेटीतून दिला.   
दिवाळीचा आनंद शेतकऱ्यांसोबत!
सणासुदीच्या काळात शेतकरी कुटुंबाच्या घरी मुक्काम, त्यांच्यासोबत भोजन, भजनात सहभाग आणि दुसऱ्या दिवशी थेट शेतात जाऊन पाहणी, अशा माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी दिवाळीचा वेळ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसोबत घालवला. या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्याबरोबरच त्यांच्या अडचणींच्या काळात शासनाची भूमिका आणि मदतीची अपेक्षा पुन्हा चर्चेत आली आहे.

Related Articles

शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! विंधन विहिरी खोदण्यावरील बंदी १५ डिसेंबरपर्यंत उठवली

⬤ झुंजार सेनापती l मुंबई नागपूर, दि. ८ : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि निर्माण झालेल्या जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण...

गाळमुक्त धरण, जलयुक्त शिवारला सर्वोच्च प्राधान्य; दुष्काळावर मात करण्यासाठी फडणवीसांचा ग्रामपंचायतींना कृतीचा संदेश!

⬤ झुंजार सेनापती l नागपूर   राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी गाळमुक्त धरण आणि जलयुक्त शिवार योजनांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून, ग्रामीण भागातील पिण्याच्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!