spot_img
29.2 C
New York
Monday, July 7, 2025

Buy now

spot_img

विधानपरिषदेच्या सभापतीपदी प्रा.राम शिंदे यांची निवड

झुंजार सेनापती l नागपूर
विधानपरिषदेच्या 19 व्या सभापतीपदी प्रा. राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे प्रा. राम शिंदे यांना सभापतीच्या आसनापर्यंत सन्मानपूर्वक घेवून गेले.

विधानपरिषदेच्या सभापतीपदी विधानपरिषद सदस्य प्रा. राम शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव सदस्य श्रीकांत भारतीय, उमा खापरे व शिवाजीराव गर्जे यांनी मांडला. त्यास सदस्य मनीषा कायंदे, सदस्य अमोल मिटकरी व सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अनुमोदन दिले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रा. राम शिंदे यांचा परिचय करून दिला.

सभापती प्रा. राम शिंदे यांचा परिचय

आमदार प्रा राम शंकर शिंदे

विधानपरिषद सदस्य, माजी मंत्री

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरचे नववे वंशज.

वैयक्तिक परिचय

नाव – प्रा. राम शंकर शिंदे

जन्मतारीख – 1 जानेवारी 1967

शिक्षण – एम. एस्सी, बी.एड.

(वनस्पतिशास्त्र शरीरशास्त्र)

पत्ता – मु.पो. चौंडी, ता. जामखेड,

जि.अहिल्यानगर – 413205

भारतीय जनता पार्टीने दिलेल्या जबाबदाऱ्या आणि कार्यकाळ

— प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, महाराष्ट्र राज्य-2004 ते 2006

— तालुकाध्यक्ष, भाजपा जामखेड तालुका-2006 ते 2009

— जिल्हाध्यक्ष, भाजपा, अहिल्यानगर 2010 ते 2012

— सरचिटणीस, भाजपा, महाराष्ट्र राज्य 2013 ते 2015

— प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा, महाराष्ट्र राज्य-2021

— सदस्य, भाजपा, कोअर कमिटी, महाराष्ट्र राज्य-2022

लोकप्रतिनिधी आणि कार्यकाळ-

— सन 2000-2005 – सरपंच, ग्रामपंचायत चौंडी

— सन 2009-2014 – आमदार

227 कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून 12,500 मतांनी विजयी.

— 2014-2019 आमदार

-227 कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून 38,000 मतांनी विजयी.

— सन 2014-2016 या दरम्यान गृह, कृषी, आरोग्य व पर्यटन विभागाचे राज्यमंत्री म्हणून काम केले.

सन 2016-2019 या दरम्यान जलसंधारण, राजशिष्टाचार, ओबीसी कल्याण, वस्रोद्योग व पणन या विभागाचे कॅबिनेटमंत्री म्हणून काम केले.

(सन 2016 ते 2019 या दरम्यान तत्कालिन मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला ” जलयुक्त शिवार अभियान ” हे जलसंधारण विभागांतर्गत प्रा.शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात राबवण्यात आले

Related Articles

फळपिक विमा योजनेचे अर्ज करण्यासाठी चार दिवसांची मुदतवाढ

झुंजार सेनापती l मुंबई हवामान आधारित फळपिक विमा योजनेच्या मर्यादित कालावधीत केंद्र सरकारने मुदतवाढ करून राज्यातील फळपिक शेतकऱ्यांना दिलासा दिल्याची माहिती कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे...

शासकीय जमिनींच्या नियमांमध्ये विशिष्ट कार्यप्रणाली आणणार

झुंजार सेनापती l मुंबई सहकारी गृहनिर्माण संस्था अथवा कृषी, वाणिज्यिक, औद्योगिक व रहिवासी प्रयोजनासाठी कब्जे हक्काने अथवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या आहेत. अशा शासकीय जमिनींचे वर्गीकरण...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!