झुंजार सेनापती l बीड
मागेल त्याला सौर योजना देण्यात येते. याचा कालावधी ६ महन्यिा ऐवजी ३ महन्यिासाठी करावा, यासाठी आपण आपल्या वरष्ठि कार्यालयास पत्रव्यवहार करावा, महावितरण विभाग हा थेट शेतकऱ्यांशी संबधित येतो. याठिकाण्ी शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी येत आहेत. त्या तक्रारी निकाली काढा, माझ्या शेतकऱ्यांना जपा, त्यांना त्रास झाला नाही पाहिजे, अशा सुचना खा.बजरंग सोनवणे यांनी केज येथील आढावा बैठकीत दिल्या .
दि.३ मार्च रोजी खा.बजरंग सोनवणे यांनी केज तालुक्याच्या सर्व विभागाची आढावा बैठक येथील पंचायत समिती केज कार्यालयात सकाळी १०.३० वाजता घेतली. ही बैठक सलग चार तास चालली. यावेळी उपविभागीय अधिकारी वजाळे, तहसीलदार गिडा, कार्यकारी अभियंता आंधळे, मोराळे, गटविकास अधिकारी यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख उस्थितीत होते. तहसील कार्यालया संबंधीत श्रावणबाळ व संजयगांधी योजनेची बैठक तत्काळ घेण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्य. यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी पीकविमा, पि.एम.किसान आदींचा आढावा घेताना शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही याची काळजी घ्या, तसेच जल्ह्यिात मंडळ निहाय हवामान यंत्र मंजूर करण्यासाठी पर्यावरण मंत्र्यांकडे मागणी करू, केजमध्ये एक महन्यिापासून शहरातील लोकांना पाणी मिळत नाही. हा प्रकार चुकीचा असून अधिकाऱ्यांनी याकडे गांभर्यिाने पहावे, असे सांगताना अधिकाऱ्यांनाही चांगलेच फैलावर घेतले. पाणी पुरवठा योजना कामाची तत्काळ दुरुस्ती करून शहरातील लोकांना पाणी तत्काळ उपलब्ध करून द्या, अशा सुचनाही त्यांनी केल्या. बांधकाम विभागाने कामे दर्जेदार करून घ्यावेत, बोगस कामाची गय करू नका, अश्या सूचना केल्या. अहमदपूर ते चुंबळी फाटा हा रस्ता अत्यंत सुमार दर्जाचा झाला आहे. अशा रस्त्यामुळे अनेकांचे जीव गेलेले आहेत. त्याची सर्व जबाबदारी कॉन्ट्रॅक्टर व संबाधित अधिकाऱ्यांची आहे, त्यामध्ये तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचनाही यावेळी केल्या. भूमी अभिलेख विभागाकडे शेतकऱ्यांनी दाखल केलेले प्रस्ताव तत्काळ निकाली काढा, त्यांची आडवणूक, पिकळवणूक खपवून घेतली जाणार नाही. असा सज्जड इशाराही खा.सोनवणे यांनी दिला.