spot_img
spot_img

जास्त व्याज देणाऱ्या योजनांच्या अमिषाला बळी पडू नका

जादा व्याज देणाऱ्या ९९ टक्के योजना या फसव्या

झुंजार सेनापती l मुंबई,

राज्यातील जनतेने जास्त व्याजदेणाऱ्यायोजनांच्याअमिषास बळी पडू नये, असे आवाहनमुख्यमंत्रदेवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेमध्येकेले.सदस्य शशिकांत शिंदे यांनी टोरेस घोटाळा प्रकरणीउपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर  देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

जादा व्याज देणाऱ्या ९९ टक्के योजना या फसव्या असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीकोणीही अशा प्रकारे जादा व्याज देऊ शकत नाही. बँकेच्या व्याजदरापेक्षा दोन ते चार टक्के जास्ती व्याज दिले जाणे शक्य आहे. पण त्यापेक्षा जास्त किंवा भरघोस व्याज देणे कोणालाही शक्य होत नाही. त्यामुळे असे जादा व्याजाचे अमिष देणाऱ्या योजना फसव्याच असतात. त्यांच्या अमिषाला जनतेने बळी पडू नये आणि अशा फसव्या योजनांमध्ये गुंतवणूक करू नये असे आवाहन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

 तसेच प्रश्नाला उत्तर देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले कीराज्यातील गुंतवणूक तसेच अर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थांवर देखरेखीसाठी इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटची स्थापना करण्यात येत आहे. तसेच टोरेस प्रकरणी फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेनुसार कार्यवाही करण्यात येत आहे.

Related Articles

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

⬤ झुंजार सेनापती l मुंबई महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत होणार आहे. विधानसभा व विधानपरिषद कामकाज...

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान

⬤ झुंजार सेनापती l मुंबई : पर्यावरण वाचवणे आणि भूजल पातळी टिकवण्यासाठी पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवणे हीच आजच्या काळातील सर्वात मोठी गरज आहे....

ताज्या बातम्या

error: Content is protected !!