spot_img

नेकनूर पोलीस ठाण्यात लाचखोर पोलीस जेरबंद; नागरिकांचा फटाके फोडून जल्लोष

⬤ झुंजार सेनापती l बीड 

बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस हवालदार दत्तात्रय बळवंत (वय ४१) आणि त्याच्या वतीने लाचेची रक्कम स्वीकारणारा होमगार्ड रशीद दगडूखा पठाण (वय ५२, रा. नेकनूर) यांना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. शनिवारी दुपारी नेकनूर पोलीस ठाण्याच्या आवारातच ही धडक कारवाई करण्यात आली.

लाचखोरीच्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. यावेळी लाचेची रक्कम स्वीकारताच पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले. पोलीस ठाण्याच्या आवारातच एका पोलीस कर्मचाऱ्याला लाच घेताना बेड्या ठोकण्यात आल्याने संपूर्ण जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे, या कारवाईची माहिती नेकनूर शहरात व परिसरात वाऱ्यासारखी पसरताच अनेक शेतकरी व नागरिकांनी आनंद व्यक्त केला. काही ठिकाणी फटाके फोडून या कारवाईचे स्वागत करण्यात आले. “लाचखोरीविरोधातील ही कारवाई सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे,” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात आल्या.

दरम्यान, या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिक तपास करत आहे.

Related Articles

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या विस्तारात महाराष्ट्राची दमदार झेप

⬤ झुंजार सेनापती l मुंबई वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियोजनबद्ध प्रयत्नांतून राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या संधी विस्तारल्या असून, महाराष्ट्राने राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान अधिक भक्कम...

मराठीच्या विकासासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र कक्ष उभारणार!

 ⬤ झुंजार सेनापती l मुंबई राज्यातील मराठी भाषेचा विकास, प्रचार, प्रसार आणि संवर्धनाचे कार्य जिल्हास्तरावर अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा त्याच्या परिसरात...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!