spot_img
spot_img
spot_img

जुने वाहन मोडीत काढा नव्यासाठी सवलत मिळवा

मंत्रिमंडळाचा निर्णय

झुंजार सेनापती l मुंबई   

स्वेच्छेने वाहन मोडीत (स्क्रॅप) काढणाऱ्या वाहनधारकांना पुन्हा त्याचप्रकारचे नवीन वाहन खरेदी करताना १५ टक्के कर सवलत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. 

नोंदणीकृत वाहन निष्कासन केंद्रावर (आरव्हीएसएफ) परिवहन प्रकारातील वाहनांना नोंदणीपासून ८ वर्षांच्या आत वाहन स्वेच्छेने मोडीत काढल्यास तसेच परिवहनेतर प्रकारातील वाहनांना नोंदणी पासून १५ वर्षांच्या आत स्वेच्छेने वाहन मोडीत काढल्यास १० टक्क्यांची कर सवलत दिली जात होत होती.यापुढे एकरकमी कर लागू असणाऱ्या परिवहन (ट्रान्सपोर्ट) तसेच परिवहनेतर वाहनांना कराच्या १५ टक्के सवलत दिली जाणार आहे. तर ज्या वाहनांना वार्षिक कर लागू आहे अशा परिवहन प्रकारातील वाहनाच्या नोंदणी दिनांकापासून पुढील ८ वर्षांपर्यंत तर परिवहनेतर प्रकारातील वाहनांसाठी पुढील १५ वर्षांपर्यंत वार्षिक करात १५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. नोंदणीकृत केंद्रावर (आरव्हीएसएफ) वाहन मोडीत (स्क्रॅप केल्यानंतर ) काढल्यानंतर वाहन धारकास मिळालेले ठेव प्रमाणपत्र (Certificate of Deposit) कर सवलतीसाठी पुढील दोन वर्षे वैध राहणार आहे. यात ज्या प्रकारचे म्हणजेच दुचाकीतीन चाकी किंवा हलके मोटार वाहन मोडीत काढलेले असेलत्याच प्रकारचे वाहन खरेदीनंतर नोंदणी करताना ही कर सवलत लागू होणार आहे. याबाबतची अधिसूचना जाहीर झाल्यापासून तीन वर्षांच्या आत असे वाहन स्वेच्छेने मोडीत (स्क्रॅप) काढल्यास ही कर सवलत मिळणार आहे

Related Articles

`देवेंद्र फडणवीस आणि त्यांची चोर कंपनी हरली म्हणून गैरप्रकार!’

झुंजार सेनापती l मुंबई  मतदानावेळी बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याच्या कथित प्रकारावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला...

मथुरेच्या खासदार हेमा मालिनींचे मुंबईत मतदान

झुंजार सेनापती l मुंबई उत्तर प्रदेशातील मथुरा लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला. २०१४ पासून...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!