झुंजार सेनापती l मुंबई
राजमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जन्मोत्सवा निमित्य सन 2025 मध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. राजमाता देवी अहिल्याबाई होळकर या उत्तम प्रशासक, व दूरदृष्टीच्या अध्यात्मिक नेत्या होत्या हे सर्वश्रुत आहे. त्यांनी अध्यात्मिक सलोखा वाढवून व एकता टिकवून चालवासी युवकांना व विशेषत: घुमंतू भटक्या जमातींना समाजाच्या कल्याणाची, विकासाची प्रेरणा दिली.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अधिनस्त ‘भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषदेकडे (ICSSR) पद्मश्री डॉ विकास महात्मे, माजी खासदार तथा धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष यांनी अविरत पाठपुरावा केला. यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे हि सहकार्य मिळाले. त्यामुळे ICSSR यांनी त्यांचे अधिनस्त विविध शैक्षणिक संस्थांना महिला केंद्रित व महिला समावेशक उपक्रम राबविण्याबाबत दिशानिर्देश दिलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने महिलाच्या राजकीय, सामाजिक,आर्थिक विकास, नाविन्यपूर्ण प्रकल्पाची उभारणी, कौशल्यविकास, आरोग्यसुविधा, लिंगभेद सुधारणा, स्वसंरक्षण, डिजिटल साक्षरता इत्यादी चा समावेश आहे. याशिवाय राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे जीवनावर आधारित संशोधन प्रकल्प सुरु करून परिसंवाद, कार्यशाला इ. चे आयोजन केलेले आहे. नामवंत शिक्षणतज्ञ, प्रमुख इतिहासकार इ. विद्वान मंडळींचा या कामात सहभाग असणार आहे.
पद्मश्री डॉ. विकास महात्मे, माजी खासदार यांच्या निरंतर पाठपुराव्यामुळे शिक्षणक्षेत्र व ICSSR ने पुढाकार घेतला आहे. याबद्दल पद्मश्री डॉ. विकास महात्मे, माजी खासदार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ICSSR चे आभार मानले आहेत.



