spot_img
26.9 C
New York
Friday, July 11, 2025

Buy now

spot_img

श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्या संदर्भात तातडीने कार्यवाही करा!

-  सभापती प्रा.राम शिंदे

 झुंजार सेनापती l मुंबई

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती पुढील महिन्यात दिनांक 31 मे2025 रोजी येत आहे. त्यानिमित्त त्यांचे जन्मगाव चौंडीता.जामखेडजि.अहिल्यानगर येथे देशभरातील पर्यटक आणि इतिहासप्रेमींना त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती  देणाऱ्या श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्या संदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.

विधान भवन येथे सभापती श्री.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या बैठकीत त्यांनी संबंधितांना निर्दैशित केले. यावेळी  मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांची विशेष उपस्थिती होती. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर तर दूरदृष्यप्रणालीद्वारे नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडामअहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशियाजिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकरसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बावीस्कर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री क्षेत्र चौंडी विकास आराखडा हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असावातसेच जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावर सर्व संबंधित विभागांची चौंडी येथे बैठक घेऊन आराखड्याच्या कामास गती द्यावीपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाचे सुशोभीकरण करणेत्यांनी संदेश दिलेल्या जलसंवर्धनवृक्षसंवर्धन संकल्पनांची जपणूक करण्याच्या दृष्टीने या आराखडयास प्राधान्य द्यावे.  चौंडी येथे देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी सुव्यवस्थित रस्तेसंग्रहालयमहादेव मंदिर आणि चौंडीश्वरी मंदिर जीर्णोद्वारनिवास व्यवस्थासुसज्ज वाहनतळस्थानिक उत्पादनेखाद्यपदार्थ यांची बाजारपेठ या सोयीसुविधांना प्राधान्याने उपलब्ध करुन  देण्यात याव्यायाबाबतचा प्रस्ताव तत्परतेने सादर करण्याबाबत  सभापती प्रा.राम शिंदे आणि मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी सूचित केले. बैठकीत प्रस्तावित आराखड्याबाबत सादरीकरण करण्यात आले..

Related Articles

हिंजवडीकरांच्या समस्या सोडविण्यासाठी बृहत आराखडा सादर करा

झुंजार सेनापती l मुंबई पुण्यातील हिंजवडी ‘आयटी’ पार्क परिसरातील वाहतूक कोंडी, पूरस्थिती तसेच पिण्याच्या पाण्यासह सर्व समस्या सोडविण्यासाठी पुणे ‘मनपा’, पिंपरी चिंचवड ‘मनपा’, पुणे महानगर विकास प्राधिकरण...

स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 181 कोटी

झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील मुंबई, दि. १० : बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा उपलब्ध...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!