spot_img
4.7 C
New York
Sunday, November 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

अहिल्याभवनच्या जागेचा प्रस्ताव तातडीने सादर करा!

- आदिती तटकरे

झुंजार सेनापती l मुंबई 

रायगड जिल्ह्यातील अहिल्याभवनशासकीय महिला राज्यगृहचाईल्ड हेल्प लाईनमहिला सक्षमीकरण केंद्र व वन स्टॉप सेंटर यासाठी निश्च‍ित केलेल्या जागेसाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

रायगड जिल्ह्यात अहिल्याभवन उभारण्यासाठी सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी सचिव डॉ. अनुपकुमार यादवआयुक्त कैलास पगारेमहसूल विभागाचे सहसचिव अजित देशमुखसिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुखपनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळेमहिला व बालविकास विभागाचे सह आयुक्त राहुल मोरेकार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे यांसह अधिकारी उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या कीअहिल्याभवनकरिता अलिबाग येथे निश्च‍ित करण्यात आलेली ६० गुंठे जागा हस्तांतरित करण्यासाठी आयुक्तांमार्फत प्रस्ताव सादर करावा. या जागेवर उभारण्यात येणाऱ्या अहिल्याभवन उभारण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी. तसेच मतिमंदअनाथनिराधारशिक्षणापासून वंचित महिलांसाठी कार्यरत असलेले शासकीय कृपा महिला वसतीगृह कर्जत येथून अलिबाग येथे स्थलांतरित करण्यात यावेअहिल्या भवन उभारून कार्यान्वित होईपर्यंत सखी वन स्टॉप सेंटर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहातच सुरू ठेवावेमिशन शक्ती योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरण केंद्र उभारणे आणि त्यासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचारी उपलब्ध करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश तटकरे यांनी दिले.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सखी वन स्टॉप सेंटर सुरू करावे. नवीन पनवेल येथे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी व महिलांसाठी वसतिगृह उभारण्यासाठी कार्यवाही करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री तटकरे यांनी यावेळी दिले.

महिला व बालविकास विभागांतर्गत रिक्त पदे भरण्यात यावीत आणि जी रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे त्या प्रकियेस गती देण्याचे निर्देशही मंत्री तटकरे यांनी यावेळी दिले.

 

Related Articles

नागरिकांनो सतर्क राहून देशाच्या सुरक्षेचे कान आणि डोळे व्हा…

झुंजार सेनापती l मुंबई दहशतवादाविरुद्धचे युद्ध संपलेले नाही. या दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सजग आणि सतर्क असले पाहिजे. कान आणि डोळे बनून सुरक्षेचे...

क्रीडा युवक कल्याण विभागामार्फत ग्लोबल युथ फेस्टिव्हलचे आयोजन

झुंजार सेनापती l मुंबई शहरातील तरूणांसाठी 6 आणि 7 डिसेंबर रोजी जिओ वर्ल्ड गार्डन, वांद्रे येथे क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत श्रीमद राजचंद्र मिशन यांच्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!