spot_img
25.9 C
New York
Tuesday, July 8, 2025

Buy now

spot_img

खरीप हंगामासाठी महाबीजकडून अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा

QR कोडच्या “साथी” प्रणालीद्वारे पारदर्शकतेला प्राधान्य

झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील

आगामी खरीप हंगामासाठी महाबीज (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ) अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा करणार असून, हे सर्व बियाणे केंद्र सरकारच्या “साथी” पोर्टलवर नोंदणीकृत असणार आहे. यासोबतच प्रत्येक बॅगवर QR कोड असणार असून, त्याद्वारे शेतकऱ्यांना बियाण्याची संपूर्ण माहिती मिळणार आहे.

QR कोड स्कॅन करताच शेतकऱ्यांना बियाण्याच्या मूळ स्त्रोतापासून उत्पादन प्रक्रिया, लॅब तपासणी रिपोर्ट यांसह बियाण्याची संपूर्ण पारदर्शक माहिती मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना बियाण्याच्या दर्जाबाबत विश्वास मिळणार असल्याचे महाबीजने स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय खरीपपूर्व आढावा बैठकीत “साथी” पोर्टलचे महत्त्व अधोरेखित करत यामुळे बियाण्याची शोध क्षमता वाढून शेतकऱ्यांचा फायदा होईल, असे नमूद केले.

महाबीजने यंदाच्या खरीपासाठी मान्सून लवकर येण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर नियोजन सुरू केले आहे. काही वाणांची वाढती मागणी लक्षात घेऊन तीही पुरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यंदा ७१,००० क्विंटल बियाणे विद्यापीठांनी नव्याने संशोधित केलेल्या वाणांचे असणार आहे.

 

महाबीज केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांतर्गत अनुदानित दराने बियाणे उपलब्ध करणार असून, त्यामध्ये खालील दर लागू असतील:

 

तूर: रु. १३०/किलो

मूग: रु. १४०/किलो

उडीद: रु. १३५/किलो

भात: रु. ३०-४०/किलो (वाणानुसार)

संकरीत बाजरी: रु. १५०/किलो

सुधारित बाजरी: रु. ७०/किलो

नाचणी: रु. १००/किलो

“राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा बियाणे घटक” यामध्ये बियाणे खरेदीसाठी क्षेत्र मर्यादा १ एकरवरून २.५ एकरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

राष्ट्रीय खाद्य तेल अभियान अंतर्गत सोयाबीनच्या विविध वाणांचे बियाणे १००% अनुदानावर देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे.

राज्यातील अधिकृत विक्रेत्यांना सज्ज ठेवण्यासाठी महाबीजने सर्व जिल्ह्यांत विक्रेता सभा आयोजित केल्या आहेत. तसेच, गाव पातळीवर शेतकरी कार्यशाळा व डिजिटल प्लॅटफॉर्मवर माहिती उपलब्ध करून देण्याचे कामही सुरू आहे.

Related Articles

राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच ‘मेगा भरती’

झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील  राज्य शासनाने सर्व विभागांना १५० दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमांतर्गत आकृतीबंध, नियुक्ती नियम (रिक्रुटमेंट रूल) सुधारित करणे, अनुकंपा तत्वावरील...

फळपिक विमा योजनेचे अर्ज करण्यासाठी चार दिवसांची मुदतवाढ

झुंजार सेनापती l मुंबई हवामान आधारित फळपिक विमा योजनेच्या मर्यादित कालावधीत केंद्र सरकारने मुदतवाढ करून राज्यातील फळपिक शेतकऱ्यांना दिलासा दिल्याची माहिती कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!