spot_img
9.5 C
New York
Saturday, November 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी प्रयत्न करू

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  

झुंजार सेनापती l पुणे 

योग ही आमची परंपरासंस्कृतीआनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. ही चिकित्सा पद्धती आहे. भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायीस्वस्थ समाजाची निर्मिती व्हावी, असा प्रयत्न सर्व मिळून करूयाअसे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठश्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी आणि श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वारकरी भक्तीयोग‘ कार्यक्रमात ते बोलत होते.

 यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटीलनगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळसंत साहित्याचे अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरेविठ्ठल रुख्मिणी संस्थान पंढरपूरचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर,  पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावीविभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारपुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमारपुणे मनपा आयुक्त नवल किशोर रामक्रीडा संचालक शीतल तेली उगलेजिल्हाधिकारी जितेंद्र डूडीविद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे सदस्य राजेश पांडे आदी उपस्थित होते. 

 मुख्यमंत्री श्री. फडणवीस योग हा शरीर आणि मनाला सर्वार्थाने पुनरुज्जीवित करणारा असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेयोगाचे हे आमचे प्राचीन ज्ञान जगाने स्वीकारावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रात योग दिनाचा प्रस्ताव ठेवला आणि सर्व देशांनी पाठिंबा दिलेला हा संयुक्त राष्ट्राच्या इतिहासात एकमात्र प्रस्ताव आहे. गेले ११ वर्ष जागतिक योग दिवस साजरा करण्यात येत आहे.

 योगसाधना कोणालाही करता येते. शरीरमनाला आणि शरीरातील सर्व चक्रांना पुनुरुज्जीवित करत उभारी देण्याचे काम योगासनाच्या माध्यमातून होते. ही सर्व आसने शरीराची रचना लक्षात घेऊन रचलेली आहेत. नखापासून केसापर्यंत शरीराच्या प्रत्येक बाह्य आणि अंतर्गत अवयवाला दिशा देण्याची आणि उपचार करण्याची रचना योगासनात आहे. जगामध्ये योगासनाकडे उपचार शक्ती (हिलींग पॉवर)आरोग्यदायी जीवनशैली (वेलनेस) म्हणून पाहिले जाते, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 यावर्षी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेला एक भूमीएक आरोग्य‘ हा संदेश कृतीतून देणारा वारकरी संप्रदाय आहे. म्हणून वारकऱ्यांसोबत योगासन करणे ही एकप्रकारे आनंदाची पर्वणी आहे. आज सर्व दिंड्या मुक्कामाच्या ठिकाणी योगासन करत आहेत. तसेच ७०० महाविद्यालयातील विद्यार्थीदेखील योगासनात सहभागी झाले आहेतही आनंदाची बाब आहे. आयोजकांनी आरोग्य वारी हे नवीन रिंगण दिले असून ते पुढे कायम चालत रहावेअशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.   

मंत्री श्री. पाटील म्हणालेप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये योग दिनाचा प्रस्ताव मांडला त्यानुसार हा दिन साजरा केला जातो. आज एकाच वेळी भारत आणि जगातील जवळपास १० कोटी लोक योग करत असतील, अशी अद्भुत किमया झाली आहे. ५ हजार वर्षांपासूनच्या इतिहासातील योगाध्यानयज्ञाचे महत्त्व पुन्हा एकदा जगाच्या लक्षात आले असून यातील विज्ञानाचे सर्व जग अनुसरण करत आहे. आषाढी वारीसाठी दिंड्या जातात अशा जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात हा उपक्रम साजरा केला जावा अशी संकल्पना समोर आली असून त्यानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचेही मंत्री श्री. पाटील म्हणाले.

 प्रास्ताविकात राजेश पांडे म्हणालेयोग हा पतंजली आणि गौतम बुद्धांनी या मातीत रुजवला आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगात नेला.  पुणे शहरातील १८७ महाविद्यालयेप्राचार्यसुमारे १ हजार २०० प्राध्यापक आणि ६ हजार विद्यार्थी या योग दिनात सहभागी झाले होते. प्रशासनशासन आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला सामाजिक आशय लाभला आहे.

 यावेळी योग प्रशिक्षक डॉ. पल्लवी कव्हाणे यांच्या पथकाने उपस्थित सर्वांकडून योगाभ्यास करवून  घेतला. ताडासनभुजंगासनअर्धशलभासनमकरासनकपालभातीअनुलोम विनोम आदी आसने व प्राणायाम करण्यात आले.

 योग कार्यक्रमात आमदार सर्वश्री भीमराव तापकीरहेमंत रासनेसुनील कांबळेपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबेपिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंहजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटीलविद्यापीठाचे प्र-कुलगुरू पराग काळकरश्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त ॲड. राजेंद्र उमापभावार्थ देखणे आदी सहभागी झाले. परदेशी नागरिकविद्यापीठातील अधिष्ठाताप्राचार्यविद्यार्थी आदी योगात सहभागी झाले. यावेळी जागतिक संगीत दिनानिमित्त अभंग गायन करण्यात आले.

Related Articles

क्रीडा युवक कल्याण विभागामार्फत ग्लोबल युथ फेस्टिव्हलचे आयोजन

झुंजार सेनापती l मुंबई शहरातील तरूणांसाठी 6 आणि 7 डिसेंबर रोजी जिओ वर्ल्ड गार्डन, वांद्रे येथे क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत श्रीमद राजचंद्र मिशन यांच्या...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियानाला’ गती देणार

झुंजार सेनापती l मुंबई राज्यातील प्रत्येक महिलेच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘आदिशक्ती अभियानाला’ राज्यभर गती मिळत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी राज्यातील...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!