spot_img
12.1 C
New York
Thursday, October 23, 2025

Buy now

spot_img

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत माझगाव डॉक येथे दोन नौकांचे २७ ऑक्टोबर रोजी उद्घाटन

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मासेमारी सुविधांचा नवा अध्याय सुरू होणार

 झुंजार सेनापती l मुंबई

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खोल समुद्रातील मासेमारीला नवे बळ मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे अत्याधुनिक खोल समुद्रातील मासेमारी दोन नौकांचे उद्घाटन होणार आहे.

हा उपक्रम राज्यातील समुद्री मत्स्यव्यवसायाच्या आधुनिकीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असून, या प्रकल्पाला राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ यांचे आर्थिक साहाय्य मिळाले आहे. या योजनेचा उद्देश मच्छीमार सहकारी संस्थांची खोल समुद्रातील मासेमारी क्षमता वाढविणे, भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील संसाधनांचा शाश्वत उपयोग प्रोत्साहित करणे आणि मच्छीमारांचे उत्पन्न वाढविणे असा आहे.

राज्यातील सात सागरी जिल्ह्यांतील १४ मच्छीमार सहकारी संस्थांची निवड या योजनेंतर्गत करण्यात आली होती. प्रस्ताव प्रक्रियेनंतर जय मल्हार मत्स्यव्यवसाय विविध कार्यकारी संस्था, मुंबई शहर यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी तयारी दर्शविली होती. एनसीडीसी यांच्या निर्देशानुसार या नौकांचे बांधकाम उडुपी कोची शिपयार्ड लिमिटेड, मालपे (कर्नाटक) येथे करण्यात आले आहे.

प्रत्येक नौका १८ ते २२ मीटर लांबीची असून, ४०० ते ६०० एचपी इंजिन क्षमता, स्टील हल बांधणी, रेफ्रिजरेटेड फिश होल्ड, तसेच जीपीएस, इको साऊंडर, व्हीएचएफ रेडिओ, एआयएस, रडार यांसारखी अत्याधुनिक नेव्हिगेशन व संप्रेषण प्रणाली यामध्ये बसविण्यात आली आहेत. या नौका १० ते १५ दिवसांच्या मासेमारी मोहिमेसाठी उपयुक्त असून, विशेषतः ट्यूना लाँगलाईन व गिलनेट ऑपरेशनसाठी योग्य आहेत.

या प्रकल्पाचा एकूण खर्च ₹२०.३० कोटी असून त्यामध्ये एनसीडीएस कर्ज साहाय्य ₹११.५५ कोटी, केंद्र हिस्सा ₹४.०३ कोटी, राज्य हिस्सा ₹२.६८ कोटी व लाभार्थी संस्था हिस्सा ₹१२.०३ कोटी इतका आहे.

या नौकांच्या उद्घाटनामुळे महाराष्ट्रात खोल समुद्रातील शाश्वत मासेमारीचा नवा अध्याय सुरू होणार आहे. यामुळे किनारी मासेमारीवरील दबाव कमी होईल, ट्यूना मासेमारीला चालना मिळेल आणि ब्लू इकॉनॉमी बळकट होईल.

हा प्रकल्प “डीप सी ट्यूना फ्रॉम महाराष्ट्र” या उपक्रमाशी निगडीत असून, सागरी निर्यातीचे मूल्य वाढविण्यासह मच्छीमारांच्या उत्पन्नातही वाढ घडवेल. आधुनिक तंत्रज्ञान, शीत साखळी सुविधा आणि सहकारी व्यवस्थापनामुळे हा उपक्रम संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी विशेषतः एसडीजी १२ आणि एसडीजी १४ – सुसंगत ठरतो.

या निमित्ताने महाराष्ट्राच्या सागरी मत्स्यव्यवसाय क्षेत्रात शाश्वतता, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मासेमारी सुविधांचा नवा अध्याय सुरू होणार आहे.

Related Articles

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार तीन हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रासाठी मदत

झुंजार सेनापती l मुंबई यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित...

नाशिक कुंभमेळ्यात भाविकांच्या सेवेसाठी हजारो तरुण राहणार कार्यरत

झुंजार सेनापती l मुंबई आयटीआयमध्ये सुरु होणाऱ्या ‘वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट’ या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार असून पुढच्या वर्षी नाशिक येथे...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!