झुंजार सेनापती l प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात उत्पादित डाळिंबाचा हंगामातील पहिला कंटेनर मुंबईतील जेएनपीटी बंदरातून समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना करण्यात आला आहे. वाशी येथील कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रावर प्रक्रिया पूर्ण करून सुमारे 17.6 मेट्रिक टन डाळिंब निर्यात करण्यात आली आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
जागतिक बाजारात स्पर्धात्मक दर मिळावा यासाठी राज्य शासन अत्याधुनिक पणन व्यवस्था विकसित करत असून, या निर्यातीमुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात 20 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले



