झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील
महाराष्ट्राच्या राजकारणात आज महत्त्वाची घडामोड घडत असून ठाकरे बंधूंच्या युतीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आगामी राजकीय लढाईत एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
मराठी अस्मिता, महाराष्ट्राचा विकास आणि जनहिताचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून ही युती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, युतीमुळे महाविकास आघाडीला बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे लवकरच संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीबाबत अधिकृत भूमिका मांडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाकरे बंधू एकत्र आल्याने आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.



