झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतील (भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस) जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात युती करण्यावर अंतिम सहमती झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. युतीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून आज महायुतीची तिसरी बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिकेवर सत्ता कायम राखण्यासाठी महायुतीकडून एकत्रित रणनीती आखली जात असून उमेदवार निवड व प्रचार आराखड्यावरही चर्चा होणार आहे.



