झुंजार सेनापती l मुंबई
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकांसाठी जिल्हा परिषदांच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1,462 जागा आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत आयुक्त वाघमारे बोलत होते. यावेळी आयोगाचे सचिव सुरेश काकाणी उपस्थित होते.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांतील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होत आहे.
मतदान सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होणार आहे. 16 जानेवारी २०२६ रोजी निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत सूचना प्रसिद्ध केली जाईल.
ठळक मुद्दे (Key Highlights)
🔹 एक मतदार – दोन मते
जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक एकाचवेळी असल्याने प्रत्येक मतदाराला दोन मते द्यावी लागणार.
🔹 नामनिर्देशन ऑफलाईनच
या निवडणुकीत नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे ऑफलाईन पद्धतीने स्वीकारली जाणार.
🔹 जातवैधता प्रमाणपत्र अनिवार्य
राखीव जागांसाठी अर्ज करताना जात प्रमाणपत्रासह जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक. निकालानंतर 6 महिन्यांत प्रमाणपत्र न दिल्यास निवड भूतलक्षी रद्द.
🔹 25,482 मतदान केंद्रे; मोठ्या प्रमाणात ईव्हीएम
51,537 कंट्रोल युनिट व 1,10,329 बॅलेट युनिटची व्यवस्था.
🔹 १ जुलै 2025 ची मतदार यादी लागू
संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर (*) चिन्ह.
🔹 ‘मताधिकार’ मोबाईल ॲप
मतदाराचे नाव, मतदान केंद्र व उमेदवारांची माहिती मिळणार.
🔹 ज्येष्ठ, दिव्यांग, गरोदर महिलांसाठी विशेष सुविधा
रॅम्प, व्हीलचेअर, पाणी, शौचालय; महिला कर्मचारी असलेली केंद्रे ‘पिंक मतदान केंद्र’.
🔹 प्रचारावर कडक निर्बंध
३ फेब्रुवारी २०२६ रात्री १२ वाजता प्रचार समाप्त; जाहिरातींवर पूर्ण बंदी.
जागांचा तपशील
जिल्हा परिषद
एकूण जागा : 731
महिलांसाठी : 369
अनुसूचित जाती : 83
अनुसूचित जमाती : 25
नागरिकांचा मागासवर्ग : 191
पंचायत समिती
एकूण जागा : 1,462
महिलांसाठी : 731
अनुसूचित जाती : 166
अनुसूचित जमाती : 38
नागरिकांचा मागासवर्ग : 342
महत्वाच्या तारखा
निवडणूक सूचना : १६ जानेवारी २०२६
नामनिर्देशन : १६ ते २१ जानेवारी २०२६
छाननी : २२ जानेवारी २०२६
माघार/चिन्ह वाटप/अंतिम यादी : २७ जानेवारी २०२६
मतदान : ५ फेब्रुवारी २०२६
मतमोजणी : ७ फेब्रुवारी २०२६



