spot_img
spot_img

आभाळाएवढी उंची असलेल्या नेत्याच्या अपघाताची साधी एफआयआर सुद्धा घेत नाहीत

रोहित पवारांनी दिले सीआयडीकडे पुरावे

झुंजार सेनापती | मुंबई
राज्यातील दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणातील सर्व माहिती आणि उपलब्ध पुरावे अधिकृतपणे सीआयडीकडे सुपूर्द केल्याची माहिती दिली. त्यांनी ‘एक्स’ (माजी ट्विटर) या सामाजिक माध्यमावर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली.
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे की, स्वर्गीय दादांच्या अपघाताशी संबंधित सर्व कागदपत्रे, तांत्रिक माहिती आणि उपलब्ध पुरावे त्यांनी सीआयडीकडे सादर केले आहेत. अपघातासाठी जबाबदार असलेल्या व्हीएसआर कंपनीविरोधात तसेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) विरोधात एफआयआर दाखल करणे का आवश्यक आहे, याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याचे सांगितले. या प्रकरणाची पारदर्शक आणि सखोल चौकशी व्हावी, अशी त्यांची स्पष्ट मागणी आहे.
“आभाळाएवढी उंची असलेल्या नेत्याच्या अपघाताची साधी एफआयआर सुद्धा घेतली जात नाही, याची खंत वाटते,” असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. अपघाताच्या तपासात कोणतीही ढिलाई होऊ नये, सर्व बाजूंनी चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
या प्रकरणात दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. “काहीही झाले तरी दोषींना सोडणार नाही. पूर्ण ताकदीनिशी हा लढा लढू,” असे ठाम विधान त्यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी केले आहे.

Related Articles

Tutto quello che devi sapere sul bonus Newgioco per i nuovi giocatori

In questo articolo, esploreremo nel dettaglio il bonus newgioco offerto ai nuovi giocatori. Discuteremo delle diverse tipologie di bonus disponibili, dei requisiti di scommessa,...

Kā x3000 lv piedāvājumi var uzlabot jūsu azartspēļu pieredzi

Šajā rakstā mēs aplūkosim, kā x3000 lv piedāvājumi var būtiski uzlabot jūsu azartspēļu pieredzi. Mēs izpētīsim dažādas bonusu iespējas, bezriska griezienus, un citas priekšrocības,...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!