spot_img
spot_img

आखाती देशांतील तणाव; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य सरकार सतर्क

झुंजार सेनापती l मुंबई
आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री Devendra Fadnavis हे स्वतः सातत्याने विविध प्रशासकीय यंत्रणांशी संपर्कात असून केंद्र सरकारशीही सतत समन्वय साधत आहेत. परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री Girish Mahajan यांना समन्वय कार्यात विशेष लक्ष घालण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आखाती देशांतील भारतीय दूतावास, स्थानिक प्रशासन आणि केंद्र सरकार यांच्याशी समन्वय साधून महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दुबई येथील Indian People’s Forum यांच्या सहकार्याने महाराष्ट्र सरकारने मदतीसाठी विशेष संपर्क क्रमांक जाहीर केला आहे. ज्यांना तातडीची मदत, माहिती किंवा नोंदणी करावयाची आहे त्यांनी खालील संदेश सेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक : +97150 365 4357
राज्य सरकारने नागरिकांना घाबरून न जाता अधिकृत माहितीकडेच लक्ष देण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. केंद्र व राज्य सरकार समन्वयाने काम करत असून प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेस प्राधान्य दिले जात आहे.

Related Articles

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट’चा कोनशिला समारंभ संपन्न

झुंजार सेनापती l  पुणे लता-आशा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालय प्रकल्पात रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. या कार्यात अनेक व्यक्ती...

१ मेपासून मराठी न येणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई; परवाने रद्द होणार

झुंजार सेनापती l मुंबई राज्यातील परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना येत्या १ मे महाराष्ट्र दिनापासून मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात येणार आहे. मोटार परिवहन विभागाच्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!